कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते गुण व कौशल्य आत्मसात करायला हवीत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्योजकता विकास सेल (EDC) अंतर्गत "सामाजिक कारणासह स्वयं-रोजगार" या विषयावर एक दिवसीय व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी देवदत्त पेशकर (प्रमुख ट्रेनिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट), सपना भोपाटे (जिल्हाप्रमुख जनरिक मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड), विश्वास पाटील, (जिल्हाप्रमुख, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), जयकुमार तिदार यांची उपस्थिती होती.
तसेच देवदत्त पेशकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कारणे व स्वयंरोजगार या विषयाला उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रियांका माळी यांनी मानले.
Comments
Post a Comment