आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी - कांचन धर्मे
आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी
सैदापूर - विद्यानगर येथे, समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयात साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कांचन धर्मे म्हणाल्या, मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात झोकून देऊन अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहणारे, समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी अखंड प्रयत्न करणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. त्याप्रसंगी सुनिता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, साने गुरुजींनी खऱ्या अर्थाने मानवता धर्म जोपासला. आपल्या साहित्यातून व समाजकार्यातून प्रकाशाची वाट दाखवली.
या कार्यक्रमास मा.गणेश माने, सीमा कांबळे, श्रद्धा महापुरे, ऋतुजा देवकुळे तसेच ग्रंथालयाचे सभासद, वाचक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.
Comments
Post a Comment