शकराड वार्ता समूह ासकीय आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू*
*शासकीय आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू*
सातारा दि. १:शासकीय आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) वाई, ही शासकीय संस्था असून कारखान्यांना आवश्यक असे कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून, ग्रामीण भागातील लोकांना कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सहाय्य करते. संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर जनरल,शीट मेटल वर्कर. हे ट्रेड उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाते, तसेच एसटी पासची सुविधा उपलब्ध आहे. मुलांसाठी हॉस्टेलची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. दहावी आणि बारावी समक्षता म्हणजेच आयटीआय सोबतच विद्यार्थ्यांना दहावी व बारावी चे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय झाल्यानंतर एकाच वेळेस आयटीआयचे व बारावीचे प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दोन वर्षाची बचत होणार आहे . वाई, शिरवळ, सातारा ,मधील नामांकित कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात आयटीआय मधील उमेदवारांची मागणी आहे. त्यामुळे आयटीआय पास झाल्यानंतर रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहे. आयटीआय मध्ये अत्याधुनिक सुसज्ज मशनरी व तज्ञ प्रशिक्षक वर्ग ही उपलब्ध आहे. आयटीआय ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोमवार, दि . ३ जून पासून सुरू होत आहे. प्रवेशासाठी ची वेबसाईट www.admission.dvet.gov.in ही असून या संकेतस्थळावर भेट देऊन इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज भरावा, अधिक माहितीसाठी आयटीआय वाई ,पी 17, एमआयडीसी मांढरदेव रोड, वाई. येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे.
Comments
Post a Comment