कराड वार्ता न्युज नेटवर्क कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा

कराड वार्ता न्युज नेटवर्क 
कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन; मान्यवर नेत्यांचे होणार मार्गद
कराड, ता. ६ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील घटक पक्षांच्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कराड येथे सोमवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला आहे. विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन येथे होणाऱ्या या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता विजयनगर येथे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. महेश शिंदे, अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, भाजपचे रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे आणि माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या संवाद मेळाव्याला कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.