कराड कृष्णा उद्योग समुह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार: मातोश्री ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमात डॉ सुरेशबाबा यांचे गौरवद्वार

कराड कृष्णा उद्योग समुह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार: मातोश्री ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमात डॉ सुरेशबाबा यांचे गौरवद्वार
गेले कित्येक वर्षापासून आपले एक छोटेशे रुग्णालय असावे आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला अल्पदरामध्ये उपचार मिळावेत हा ध्यास मनी बाळगून त्यासाठी अथक प्रयत्न करून मागील ५ वर्षापासून मातोश्री दवाखान्याची सुरुवात कराडमध्ये नवाजबाबा सुतार यांनी केली,सुरवातीला एक यूनिट सुरु करुन हळू हळू एका युनिटचे जवळपास ५-६ यूनिट मध्ये रूपांतर करुन एक आगळे-वेगळे रुग्णालय सर्वसामान्यसाठी उभे केले,त्यातच लोकांना डोळ्यांच्या उपचाराकरिता मोठ्या रकमा मोजाव्या लागत असून ते सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही म्हणूनच ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मातोश्री डोळ्यांचे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ सुरेशबाबा भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश बाबांनी नवाजबाबा सुतार आपण मागील ५ वर्षापासून देत असलेली अल्पदरातील सेवा या सेवेबद्दल मी आज प्रथमच ऐकत असून हे सर्व ऐकून मला अश्यार्याचा धक्काच बसला हे येवढे मोठे डॉक्टर त्यांना द्यायला लागणारा भला मोठा पगार असले १५-१६ डॉक्टर बोलावणे आणि त्यांना सांभाळणे आज भले मोठे आव्हान असून यामध्ये आपण हे सगळे कसे करत आहात याचे मला आश्यर्याच आहे..आपण करत असलेल्या कार्याला माझा पाठिंबा असून माझ्या वडिलांनी जयवंत आप्पांनी सुद्धा असेच स्वप्न मनाशी बाळगून हे स्वप्न सत्यात उतरविले आणि त्यांच्याप्रमाणेच तुम्ही पाहिलेले स्वप्न नक्कीच सत्यात उतरेल आणि यासाठी लागणारी सर्व मदत मी तुम्हास करेन आणी आपल्या दवाखान्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन कृष्णा हॉस्पिटल मधून सुरू करीन व नेहमीच तुमच्या पाठीशी संपूर्ण कृष्णा उद्योग समुह असेल अशी ग्वाही यावेळी सुरेश बाबांनी दिली,
तसेच कराड अर्बन बँकेचे सिओ दिलीप गुरव साहेब यांनी पण मातोश्री ग्रुपच्या सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले व आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी असल्याची गवाई दिली यावेळी कराड शहरातील कर्मचारी व क्रीडा क्षेत्रातील काम करणाऱ्यांना कराड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    डोळ्याचे दवाखान्याचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राजू मुल्ला, महेंद्र भोसले सर, रमजान माग्लेकर, हमीद मुल्ला, वसीमअक्रम शेख,अँड. साबीर मुल्ला, सरफराज बागवान, चांदसाब निशानदार, मुजमील, तांबोळी, शोहेब संदे, जुबेर पटेल, डॉ.घाडगे, डॉ. अन्सारी, डॉ सुर्वे, डॉ सुपेकर, डॉ शिकलगार, डॉ पाटील, डॉ शेख, डॉ मुलानी, दृष्टी हॉस्पिटलचे आष्टा यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासहीत विविध सामजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त