अस्लम मुल्ला रिपोर्टर रेठरे बुद्रुक व काले येथे दफनभूमी परिसर विकासासाठी १ कोटींचा निधी मंजूर

अस्लम मुल्ला रिपोर्टर रेठरे बुद्रुक व काले येथे दफनभूमी परिसर विकासासाठी १ कोटींचा निधी मंजूर 

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; मंत्री अब्दुल सत्तार यांचे सहकार्य


कराड, ता. १२ : कराड दक्षिण मतदारसंघातील रेठरे बुद्रुक आणि काले या गावांमधील दफनभूमी परिसराच्या विकासासाठी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांमुळे एकूण १ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन, त्याठिकाणी राहणाऱ्या अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी भाजपा-महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने कराड दक्षिण मतदारसंघातील रेठरे बुद्रुक आणि काले येथील अल्पसंख्याक समाजासाठी निधी मिळावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे केली होती. 

त्यानुसार डॉ. भोसले यांनी याकामी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. मंत्री सत्तार यांनी या मागणीची दखल घेत, अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत रेठरे बुद्रुकसाठी ३० लाख आणि काले गावासाठी ७० लाख असे एकूण १ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. 

या निधीमधून रेठरे बुद्रुक येथे नुरानी कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुधारिकरण, कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावर साकव पुलाची उभारणी व कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यानजीक संरक्षण भिंत बांधणे ही तीन विकासकामे केली जाणार आहेत. तसेच काले येथील मुस्लिम दफनभूमीसाठी संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. 

या विकासकामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

सोबत फोटो : 
ना. अब्दुल सत्तार व डॉ. अतुलबाबा भोसले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.