कराड वार्ता न्युज अस्लम मुल्लाकराड दक्षिणेतील ३४.२५ कोटींच्या विकासकामांना राज्य पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी


कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला
कराड दक्षिणेतील ३४.२५ कोटींच्या विकासकामांना राज्य पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश
 
कराड, ता. ७ : नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर मंजुरी दिली आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील सुमारे ३४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण व महायुती सरकारचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

कराड दक्षिणमधील विविध कामांसाठी निधी मंजुर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांना मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेत आज थेट राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात या कामांचा समावेश करुन, या विकासकामांसाठी भरीव निधीचीही तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पात आज मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये कराड दक्षिणमधील घारेवाडी ते पोतले ग्रा.मा. १६४ पाटीलमळा येथे निरुपयोगी झालेल्या फरशी पुलाच्या ठिकाणी नवीन पुल बांधणे (४० लाख), विंग जोडरस्ता ग्रा.मा. १६८ ची सुधारणा करणे (५० लाख), शेणोली स्टेशन ते शेरे थोरात मळा ग्रा.मा. २२० रस्ता सुधारणा करणे (५० लाख), वाठार म्हसोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग ४ रस्ता ग्रा.मा. २३७ सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), काले  रस्ता ग्रा.मा. २३९ सुधारणा करणे (१ कोटी), रा.मा. १४४ ते चपनेमळा ग्रा.मा. २४१ सुधारणा करणे (१ कोटी), ग्रा.मा. १८३ वडगाव हवेली ते चव्हाण मळा ते भवानी मंदीर ते वाघ डबरा रस्ता सुधारणा करणे (२ कोटी), कासारशिरंबे यादव मळा काटकर मळा सावंत मळा रस्ता ग्रा.मा. ३१३ सुधारणा करणे (१ कोटी), आगाशिवनगर कराड ढेबेवाडी रस्ता ते कोयना नदीकडे जाणारा रस्ता ग्रा.मा. ३२५ ची सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), खोडशी ते सैदापुर रस्ता ग्रा.मा. १०८ ची सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), ओगलेवाडी बाबरमाची ते गोवारे रस्ता ग्रा.मा. १२५ सुधारणा करणे (१ कोटी २० लाख), चचेगाव येरवळे पोतले कोळे पाणंद रस्ता ग्रा.मा. १६२ सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), वाठार से कालवडे रस्ता ग्रा.मा. २७३ सुधारणा करणे (१ कोटी ५०), दुशेरे ते विकास पाणंद रस्ता ग्रा.मा. २१७ सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), खुबी कृष्णा कॅनॉल ते कारखाना रस्ता काळुबाई पाणंद रस्ता ग्रा.मा. २८१ सुधारणा करणे (२ कोटी ७० लाख), रेठरे खुर्द ते वेताळबा पाणंद रस्ता ग्रा.मा. २३६ सुधारणा करणे (९० लाख), वनवासमाची ते रा.म.मा. ४ रस्ता ग्रा.मा.९८ सुधारणा करणे (१ कोटी), रा.मा.१४८ ते सावंत मळा (रेठरे बुद्रुक) ग्रा.मा.२७८ रस्ता डांबरीकरण करणे (१ कोटी), रेठरे बुद्रुक  रस्ता ग्रा.मा. २३५ सुधारणा करणे (७० लाख), नांदगांव ते रा.मा १४४ ते पवारवाडी रस्ता ग्रा.मा. २४५ सुधारणा करणे (१ कोटी ५५ लाख), बोत्रेवाडी ते शेवाळवाडी जिंती रस्ता ग्रा.मा. ३०३ सुधारणा करणे (१ कोटी ६० लाख), कुसुर तारूख बामणवाडी वानरवाडी चाळकेवाडी रस्ता ग्रा.मा. २१० सुधारणा करणे (२ कोटी ५० लाख), धानाई मंदिर गोपाळनगर शिंदेवस्ती मोळाचा मळा ते वडगांव हवेली रस्ता ग्रा.मा.१७८ सुधारणा करणे (४ कोटी २० लाख) अशा एकूण ३४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड तालुक्यातील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच या कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याने  ही कामे लवकरच मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
 
सोबत फोटो :

ना. देवेंद्र फडणवीस, ना. रवींद्र चव्हाण व डॉ. अतुल भोसले

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.