कराड वार्ता न्युज भाजपाचा अश्वमेध तीन राज्यातही उधळतोय.मोदी मॅजिक अजूनही सुरूच. कराड उत्तर भाजपाने मिठाईवाटून साजरा केला आनंद उत्सव
कराड वार्ता न्युज
भाजपाचा अश्वमेध तीन राज्यातही उधळतोय.
मोदी मॅजिक अजूनही सुरूच.
कराडः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा अश्वमेध यावेळी कोणीही रोखू शकलेला नाही. तीन राज्यांमध्ये यश मिळवून देशाचा विकास फक्त भाजप करू शकते हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. 2024 ही भाजपाचे असेल असा विश्वास या निवडणुकीने दिल्याने कराड उत्तर मध्ये या निवडणुकीसाठी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.
मध्यप्रदेश सह काँग्रेस शासित राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सैदापूर येथे भाजपा सातारा लोकसभा समन्वयक व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या सैदापूर विद्यानगर येथील संपर्क कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ भाजपा कराड उत्तर तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार महिला आघाडीच्या दिपालीताई खोत यांची सह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपाने विजयाचा महामेरू सुरू ठेवला असून आगामी लोकसभेच्या ऐतिहासिक विजयासाठी ही नांदी ठरली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी हा विजय म्हणजे नवी प्रेरणा मिळाली आहे .आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी चे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आता सज्ज झालो आहोत. चौकट.
महाराष्ट्रामध्ये ही भाजपशासित राज्य सरकार येणार.
पाचपैकी तीन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा विजयी करून गेला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मोदी मॅजिकच चालणार आहे.अनेकांची सत्ता आणि संस्थाने या निवडणुकीमध्ये उध्वस्त होणार आहेत. निष्क्रिय राज्यकर्त्यांना जनता खड्यासारखी वेगळी करणार आहे. रामकृष्ण वेताळ. भाजपा सरचिटणीस, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.
Comments
Post a Comment