कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटी जाहीर* सर्व जेष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश


कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
 *कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटी जाहीर* 

सर्व जेष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश 

 *कराड:* माज़ी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेवरून तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मान्यतेने तसेच कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या शिफारशीनुसार कराड उत्तर ची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत कराड उत्तर मध्ये आजपर्यंत एकनिष्ठेने कार्यरत असलेले सर्व जेष्ठ व युवक कार्यकर्यांची मोट बांधण्यात अध्यक्ष निवासराव थोरात यांना यश आलेले आहे. निवासराव थोरात यांची कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी प्रसिद्ध होणे प्रतिक्षेत  होती, त्यानुसार कराड उत्तर मधील साडे चार जिल्हा परिषद गटातील तसेच सर्व पंचायत समिती गणातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. 

या कार्यकारिणीत ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील दादासाहेब वसंतराव चव्हाण, चरेगाव जिल्हा परिषद गटातील मोहनराव एकनाथ माने, पाल जिल्हा परिषद गटातील सुनील धोंडीराम पाटील, मसूर जिल्हा परिषद गटातील सुदाम काशिनाथ दीक्षित, उंब्रज जिल्हा परिषद गटातील कॅप्टन इंद्रजीत सुरेशराव जाधव, तसेच हजारमाची गणातील दिपक शंकर लिमकर यांच्या निवडीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणीचे खजिनदार पदी भाऊसाहेब अण्णा घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीत सरचिटणीस पदी राजेंद्र शामराव पाटील, लहुराज भिकोबा यादव, विजयकुमार सुभाष कदम, संभाजी गुलाबराव यादव, विजय बाबुराव पाटील, दिलीप उत्तम साळुंखे, प्रतापराव जयसिंगराव पवार, चंद्रकांत निवृत्ती साळुंखे, भिमराव विठ्ठल डांगे, विजय जोतीराम पवार, मुकुबुल बाबालाल मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणीत चिटणीस पदी आनंदराव बाबुराव चव्हाण, शहाजीराव रावसाहेब पवार,सुरेश हिंदुराव घोलप, रामचंद्र मारुती साळुंखे, किसन शांताराम पावसे, प्रशांत रघुनाथ मोरे,संदीप सुखदेव गायकवाड, शिवाजी कुंडलिक इंगवले,निवास बाबासो थोरात, राजेंद्र भिकोबा पाटील, भिमराव धोंडी थोरात, विशाल अजित मोहिते, संतोष उत्तमराव कांबळे, दिपक विठ्ठल शिंदे, अधिकराव शामराव नलवडे, प्रकाश नामदेव पवार, सतीश आकाराम पवार, बाबासाहेब भिमराव पवार, राजकुमार आण्णासाहेब धोकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच कार्यकारिणीमध्ये सदस्य पदी सर्वच जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळ घातलेला दिसत आहे, यामध्ये निवास बाळू जाधव, अमोल हिंदुराव पवार, शैलेश किसन वाकळे, संग्राम अधिकराव पाटील, धनाजी दिनकर संकपाळ, गोरख शंकर यादव, प्रदीप बाबासो कोळी, सत्यवान नामदेव चव्हाण, प्रकाश बबन मोरे, निवासराव विठ्ठल पाटील, महेंद्र दिनकर जाधव, संजय निवृत्ती गोडसे, प्रकाश निवृत्ती खंडागळे, संजय गंगाराम काराळे, आर के माने (सर), सावळाराम शंकर कांबळे, शकील नुरुद्दीन शेख, रवींद्र भिकोबा सूर्यवंशी, जयसिंग परशराम घाडगे, सयाजी तुकाराम सुर्वे, अमरेश चव्हाण, दादासाहेब धोंडीराम निकम,अजय लक्ष्मण शिंदे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी एकूण कराड उत्तर ब्लॉक कमिटीची ६० पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्धीस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी मान्यता दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.