कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला 
स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने
कराड, ता. ८ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केले आहे. याबद्दल खर्गे यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण शाखेच्यावतीने मलकापूर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. 

कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न उपस्थित करुन देशातील संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत. पण या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिला. यावेळी खर्गे आणि काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी कापीलचे माजी सरपंच मोहनराव जाधव, पंकज पाटील, धनाजी माने, नंदकुमार जाधव, बाळासो पवार, प्रदीप जाधव, संजय पाटील, अरुण जाधव, संजय सावंत, जयकर मोरे, विक्रम जाधव, शिवराज जाधव, महादेव कुंभार, शिवराज जाधव, संभाजी ढापरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी :

मलकापूर : स्वा. सावकरांचा अपमान करणाऱ्या प्रियांक खर्गेंविरोधात निदर्शने करताना भाजपा दक्षिणचे कार्यकर्ते.

Comments

Popular posts from this blog

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त

*नवाजबाबा सुतार यांचे प्रयत्नांना मोठे यश " राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार राज्य सरकारचे आदेश जारी* "...कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क