सर्वसामन्य नागरिकाच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर उपयुक्त
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबीर उपयुक्त _____
रोटरी क्लब चे अध्यक्ष विलासराव पवार
रेठरे बुद्रुक वार्ताहर ---
सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी रोटरी क्लब चे आरोग्य शिबिर उपयुक्त ठरेल.कष्टकरी नागरिकांची पैशाअभावी आरोग्याची होणारी हेळसांड कमी करण्यासाठी मलकापूर रोटरी क्लब चा हा उपक्रम गरीब गरजू लोकांच्या फायद्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत रोटरी क्लब चे अध्यक्ष विलासराव पवार यांनी व्यक्त केले.ते नांदलापूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नांदलापूर ता.कराड येथे रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्यावतीने डॉक्टर डे चे औचित्य साधून एक आगळा वेगळा आरोग्य शिबिर हा उपक्रम साजरा केला. समाजमान्य कीर्तिमान डॉक्टरांना घेऊन गरजू गरीब लोकांच्या मध्ये जाऊन त्यांची सेवा घडवली आणि त्यांचा सत्कार केला. रोटरी क्लब ऑफ मलकापूर ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. आज रोटरी नविन वर्षाची सुरुवात करीत आहे, आणि त्याचा श्रीगणेशा आरोग्य शिबीर आयोजित करून केला आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ मलकापूर चे अध्यक्ष रो. विलासराव पवार, सेक्रेटरी रो. विनोद आमले आणि सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.
मौजे नांदलापूर हे कष्टकरी रोजगारी गोपाळ वस्तीने बनलेले गाव आहे, आर्थिक समस्येमुळे लोकांच्या आरोग्याची हेळसांड होते, त्यांना आज एकत्र करून त्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे वाटण्यात आली.तसेच यावेळी आरोग्य सुविधा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने डॉ. अमोल मोटे, डॉ. संतोष जाधव, डॉ. सौ. सुषमा मोटे, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. विनायक रोकडे, डॉ. सौ. अर्चना रोकडे, डॉ. प्रकाश कदम, डॉ. सौ. शितल जाधव यांचा डॉक्टर डे निमित्त सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक रो. चंद्रशेखर दोडमनी यांनी केले, अध्यक्ष विलासराव पवार यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी जनता स्वतःचा संसार चाळविताना पोटाला चिमटा घेवून स्वतः आजारी असले तरी पैशाअभावी स्वताकडे दुर्लक्ष करतात अशा गरजू लोकांना शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा रोटरीचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अमोल मोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, राहुल जामदार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, यावेळी सलीम मुजावर, भगवान मुळीक, राजन वेळापुरे, संदीप पाटील, प्रविण जाधव, विकास थोरात, विक्रम औताडे ,विश्वास निकम, शिर्के सर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.सेक्रेटरी विनोद आमले यांनी आभार मानले
Comments
Post a Comment