कराड शहरात आलाय श्रेय वादाचा महापूर वाढीव पाणी बिलाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही येथून पुढच्या काळात एकजुटीने लढा देणे आवश्यक

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क रिपोर्टर अस्लम मुल्ला 
कराड शहरात आलाय श्रेय वादाचा महापूर  वाढीव पाणी बिलाचा  प्रश्न अद्याप सुटलेला नाही येथून पुढच्या काळात एकजुटीने लढा देणे आवश्यक
असे प्रतिपादन यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले
कराड शहरात 24 तास पाणी मीटर प्रमाणे बिलाचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी वार्षिक बिले वसूल करा असे आदेश दिल्यानंतर कराड शहरात मुसळधार पावसाप्रमाणे श्रेयवादाचा महापुर आला पाणी बिलावर स्वल्पविराम मिळाला मात्र पाणी प्रश्न शिल्लक आहे या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा उभारावा असे वक्तव्य कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी माजी सभापती विजय वाटेगावकर माजी नगरसेवक हनमंत पवार बाळासाहेब यादव ओमकार मुळे व कार्यकर्ते उपस्थित होते
लोकांना मीटर प्रमाणे बिले  देण्यात आले या बिलावर सवलत मिळावी अशी लोकांची मागणी होती हा प्रश्न स्थानिक प्रशासकाच्या हाती नसल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मीटर प्रमाणे बिलाच्या वसुलीवर स्थगिती आणण्यात आली हे काम करून देखील आम्ही कोणत्या प्रकारचे श्रेय घेतले नव्हते अशी माहिती देखील राजेंद्रसिंह  यादव यांनी दिली
नवीन बिलावर वसुलीची स्थगिती होती मात्र वार्षिक बिलावर वसुलीवर स्थगिती नव्हती तरीदेखील मागील प्रशासकांनी बिलाची वसुली केली नाहीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जुन्या वार्षिक बिलाची वसुली करावी असे आदेश दिले आहेत त्यावर स्थगिती नव्हती तसेच मीटर प्रमाणे बिलावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही स्थगितीचे मुख्यमंत्र्यांचे पत्र आमच्या जवळ आहे मात्र अनेक जण श्रेय घेताना दिसत आहेत त्यांनी या संदर्भातले कागद दाखवावे असे आवाहन देखील यादव यांनी केले
मीटर प्रमाणे पाणी बिलाचा प्रश्न अद्याप संपलेला नाही हा  प्रश्न सोडवण्यासाठी कराड शहरातील नागरिकांनी गटातटाचे राजकारण न करता एकत्रित लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राजेंद्रसिंह यादव यांनी केले
24 बाय सात पाणी योजना सुरू होणे गरजेचे आहे मात्र नागरिकांना दिले परवडणारे असावेत या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहे या संदर्भात कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तसेच पाणी प्रश्न बाबत एक समिती नेमून योग्य मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे देखील राजेंद्रसिंह  यादव यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक