कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात खाजगी इसमाकरवी तीन हजारांची स्वीकारली लाच; कराड वार्ता न्युज कराड/प्रतिनिधी : - कराडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती पाच हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यातील खाजगी इसमाकरवी तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईत संबंधित खाजगी इसमाने स्वीकारलेली तीन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. भिमराव शंकर माळी (वय ३७) कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवान रा. मलकापूर (ता. कराड) व मुस्तफा मोहिदिन मणियार (वय २५) देशी दारू दुकान मॅनेजर (खाजगी इसम) रा. लक्षीनगर, मलकापूर (ता. कराड) अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क, सातारा विभागाच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कराड कार्यालयाचा जवान भिमराव माळी याने अवैध दारु विक्री केल्याबाबत तक्रारदार यांच्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये...
Comments
Post a Comment