Karad आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये जंगली प्राणी- सिंह,ससा, हरण, डोरेमॉन, जोकर- कार्टून्स नी केले नवागतांचे स्वागत.
Karad आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये जंगली प्राणी- सिंह,ससा, हरण, डोरेमॉन, जोकर- कार्टून्स नी केले नवागतांचे स्वागत.
शाळा हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असून शाळा म्हणजे मुलांना घडविणारे औपचारिक असं केंद्र आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी आदर्श प्राथमिक विद्यालयाचा परिसर बालचमुंच्या किलबिलाटाने बहरून गेला.
भारतीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे हा विचार सार्थ ठरवत औक्षण करून नवागतांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात चैतन्यमय वातावरण द्विगुणित करण्यासाठी विनायक सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रेशन डान्स घेण्यात आला ,तेव्हा उपस्थित विद्यार्थी विविध नृत्यावर थिरकली. आनंददायी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चक्क जंगली प्राणी-वाघ, सिंह ,गोरिला, ससा,हरण ,डोरेमॅन आणि जोकर्स कार्टूनच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय वस्तूं भेट स्वरूपात देण्यात आल्या. विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, अध्ययन अध्यापन प्रणालीत सहजता यावे यासाठी अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार मध्ये नियमितपणे घेतले जातात..जंगल-जंगल बात चली है ...,ससा हो ससा...यांसारख्या बालगीतांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
दुपार सत्रात विद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्यांनी दहावी-बारावी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेले अशा यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन मेळाव्याचे आयोजन करून गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणींनाना उजाळा देत विद्यालयाप्रति व शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाचे पालक, हितचिंतक, संस्थेचे सचिव मा.अशोकराव थोरात (भाऊ), अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्कर पाटील , खजिनदार तुळशीराम शिर्के, संचलिका डॉ.स्वाती थोरात मुख्याध्यापक सचिन शिंदे शिशु विहारच्या मुख्याध्यापिका लता नलवडे, रफिक सुतार, वैभव शिर्के ,सोपान जगताप, रूपाली कुंभार, प्राजक्ता पाटील ,अश्विनी पाटील, अश्विनी यादव, रंजना कांबळे ,सुवर्णा पाटील,शबाना मुल्ला, नंदा पानवळ, जयमाला पाटील, शितल भिसे, मेघा भाटे, वैशाली शिंदे ,संग्राम काकडे व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात नवागतांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.
Comments
Post a Comment