कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर कराड, ता. १२ कराड वार्ता न्युज : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. कृष्णा कारखान्याच्या...
*वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांचा प्रचाराचा धडाका* *कराड* : वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव (आप्पा) पाटील यांनी प्रचाराची जोरदार धडाकेबाज तयारी सुरू केली आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांनी गटातील सुमारे साडेआठ हजार कुटुंबांपर्यंत जाऊन दिवाळी किटचे वाटप केले. सामाजिक दृष्टिकोन ठेवून राजकारणात सक्रिय असलेले नामदेवराव आप्पा पाटील हे दूरदृष्टी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. वारुंजी पंचायत समिती सदस्य असताना गणातील प्रत्येक गावात त्यांचा थेट संपर्क असून, समाजकार्यास प्राधान्य देणारे कार्य हेच त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास झालेला आहे. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटात नामदेवराव पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून स्थानिक विकासाला चालना दिली आहे. नामदेवराव आप्पा पाटील म्हणाले, “कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हा आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झ...
कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी बाबासाहेब कल्याणीसाहेबांच्या स्वागतासाठी बाल चिमुकल्याणसह संपूर्ण गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद कराड - कोळे गावाच्या विकास कामांसाठी लागेल तेवढी मदत मी करणार आहे. कोळे हे गाव माझे गाव असून हे गाव मला एक विशिष्ट ठिकाणी न्यायचे असून यासाठी गावकऱ्यांचे हातभार असणे गरजेचे आहे. कोळ्याचे नाव हे अभिमानाने मला घेता आले पाहिजे. कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे आहे त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.भारत फोर्सच्या सी.आर. एस. फंडाच्या माध्यमातून लागेल ती मदत, लागेल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही भारत फोर्जचे चेअरमन, पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणीसाहेब यांनी सांगितले. जगप्रसिद्ध उद्योजक फोर्जिग क्षेत्रात विशेष असे ज्या कंपनीने ठसा उमटवला व संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वदेशी रणगाडे, तोफा व इतर सामुग्री पुरवणारी कंपनी. 20 ते 25 देशात विस्तार असणारी कंपनी भारत फोर्ज चे चेअरमन पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणी यांनी त्यांच्या मूळ गावी कोळ...
Comments
Post a Comment