महावितरणच्या गलथान कारभार व विजेच्या लपंडावा विरोधात सुपने विभागातील शेतकरी आक्रमक* *मुंढे येथे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन दिला तीव्र आंदोलनाचा इशारा*
*महावितरणच्या गलथान कारभार व विजेच्या लपंडावा विरोधात सुपने विभागातील शेतकरी आक्रमक*
*मुंढे येथे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन दिला तीव्र आंदोलनाचा इशारा*
*दिनांक ५* गेल्या १५ दिवसापासून सुरू असलेल्या शेतीपंपाच्या विजेच्या खेळ खंडोब्या विरोधात सुपने व परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी महावितरण व प्रशासनाला असहकार आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे, निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे,गेले १५ दिवस शेतिपंपाच्या विजेचा लपंडाव सुरू असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे,परिणामी शेतकरी वैतागले असून पाणी उपलब्ध असूनही पिके होरपळून चालली आहेत,याकरता अखंडीत वीजपुरवठा करण्यात यावा. शेती पंपना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीज देण्यात येत होती मात्र रात्रीचे २ तास परस्पर कमी करण्यात आले आहेत,तरी ते पूर्ववत देण्यात यावेत.एप्रिल मे हे तीव्र उन्हाळ्याचे महिने असताना वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत आहे,तरी अखंडीत वीज देण्यात यावी. प्रत्येक सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याची निव्वळ निवडणुका पुरती फसवी घोषणाबाजी केली जाते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही,शेतकरी वर्षानुवर्षे रात्री अपरात्री बिबट्या,साप,विंचू अशा प्राण्यांच्या दहशतीत,मृत्यूच्या टांगत्या तलवारी खाली शेतीला पाणी देण्यासाठी नाईलाजाने रात्रीचा दिवस करत आहेत,शेजारी अनेक राज्यात २४ तास वीज पुरवठा होत असताना महाराष्ट्रात का नाही ?.
शेतीला दिवसा वीज देण्याचा निर्णय ताबडतोब घेण्यात यावा.
काही राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येते मात्र महाराष्ट्रात अगोदरच इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड महाग असणारी विज आणखी दरवाढ करून शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर महाग करण्यात आली आहे.तरी ही अन्यायी वीज दरवाढ ताबडतोब मागे घेण्यात यावी.
शेत शीवा रातले वीजपुरवठा करणारे डीपी, पोल,ट्रान्सफॉर्मर,तुटक्या तारा,उघडे फ्युज बॉक्स,वाकलेले पोल,यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,तरी सर्व यंत्रणा नवीन करण्यात यावी.महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित झाल्यास,अगर काही तांत्रिक अडचण आल्यास वेळेवर उपलब्ध नसतात,परिणामी अनेक तास वाया जातात,तरी कामचुकार कर्मचाऱ्यांना कठोर समज देण्यात यावी.
*वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा अन्यथा महावितरण तसेच राज्य प्रशासन यांचे विरोधात असहकार आंदोलन करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
*यावेळी सूपने,पश्चिम सुपने, साकुर्डी,वसंतगड,अबई ची वाडी,म्हॉप्रे, केसे,मुंढे,विजयनगर,पाडली या गावातील शेतकरी,सरपंच,उपसरपंच,सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
Comments
Post a Comment