महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे बाजूच्या शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे योग्य नियोजनाने मार्गाचे काम पूर्ण करा. पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, मार्गाचे विद्युतीकरण, होणारी वाहतूक कोंडी यासह अन्य मुद्यांवर सविस्तर चर्चा करून त्याबाबतच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांना केल्या.

     महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे बाजूच्या शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे योग्य नियोजनाने मार्गाचे काम पूर्ण करा. पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, मार्गाचे विद्युतीकरण, होणारी वाहतूक कोंडी यासह अन्य मुद्यांवर सविस्तर चर्चा करून त्याबाबतच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांना केल्या. 
     शेंद्रे ता.सातारा ते मालखेड ता.कराड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि प्रवासी व नागरिकांना येत असलेल्‍या अडचणी सोडविण्यासाठी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांसोबत करा़ड येथे त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीसाठी महामार्ग प्रकल्प व्यवस्थापक वसंत पंदरकर, डी.पी.जैन कंपनीचे मॅनेजर प्रदीप जैन यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
      खा.श्रीनिवास पाटील यांनी शेंद्रे ते मालखेड या मार्गाचा आढावा घेत महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे असा सवाल करून या कामाला गती द्या. हा रस्ता तयार होत असताना बाजूच्या शेतक-यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतीचे नुकसान, शेतमाल वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी पूल बांधण्यात येणार आहेत त्यावर विद्युतीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचीही तरतूद करा.
     कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कामाचे योग्य नियोजन करण्यात यावे. लोकांच्या सोयीसाठी कोल्हापूर नाक्यावर साताराकडे जाताना यू टर्न सुरु करण्यात यावा. उंब्रज येथे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होत असते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार येथील जुना पूल पाडण्यात येऊन नवीन उड्डाणपूल बांधण्यात यावा. तसेच लोकांना रस्त्याच्या अलीपलीकडे पायी जाण्यासाठी मार्ग ठेवावा अशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची मागणी असून याबाबत विचार व्हावा.
       इंदोली येथील पूल उतरल्यानंतर महामार्ग ते सर्व्हिस रस्ता जोडताना योग्य ती खबरदारी घेतली गेली नसल्याने याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्यामुळे येथे तात्काळ उपाययोजना कराव्यात. सहापदरीकरणाच्या कामामुळे सर्व्हिस रोडची उंची वाढली आहे. परिणामी शेतक-यांना शेतमाल काढता येत नाही. त्यामुळे सर्व्हिस रोडची योग्य उंची ठेवावी. ऊसतोड हंगामामध्ये ऊस तोडणी करून साखर कारखान्याकडे जाणारी वहातूक वाढल्याने वाठार येथे मोठया प्रमाणात वहातूक कोंडी होऊन वहानांच्या रांगा लागतात. त्यावर उपाययोजना आखाव्यात. कराड ते रत्नागिरी रस्त्याजवळ पाचवड फाट्यानजीक महामार्गावरील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच येथील पेट्रोल पंपानजिक सर्व्हिस रस्त्यावर पाणी सतत साठून रहाते. याचा सर्व्हे करून उपाय करावा. नारायणवाडी आटके टप्पा येथील रेगेचा ओढा येथे पाईप पूल ऐवजी ओपन बॉक्सचा पूल बांधण्यात यावा. शेद्रे ते खिंडवाडी पर्यंत महामार्ग खचत आहे. त्यामुळे हा ३ किमीचा भाग कॉंक्रिटीकरण करावा. महामार्ग तयार करण्यासाठी रस्त्याच्या लगत असलेल्या अनेक छोट्या मोठ्या झाडांची तोड करण्यात आली. दोन्ही रस्त्यांच्या बाजूने नवीन वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यावेळी संगण्यात आले होते. परंतु अपेक्षित वृक्ष लागवडीचे काम झालेले नाही. याबाबत काही उपाययोजना नियोजनात आहेत का ? असा प्रश्न केला. 

उंब्रज, अतित, नागठाणे येथे नवीन पूल होणार-
खा.श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या अनुशंगाने विविध सूचना बैठकीत केल्या. उंब्रज, अतित, नागठाणे येथे रस्ता ओलांडताना अपघात होत असल्याने याठिकाणी पुल बांधण्यात यावेत अशी महत्वाची सूचना केली. यावर सदर ठिकाणी नवीन पूल बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करून कार्यवाही केली जाईल अशी माहीती महामार्ग अधिका-यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक