दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी राज्यपाल व साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या थेट घरी जाऊन शाब्बासकी दिली


    दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी राज्यपाल व साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या थेट घरी जाऊन शाब्बासकी दिली. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या त्यांच्या शुभेच्छांनी विद्यार्थ्यांसह पालकही भारावून गेले.
    शुक्रवारी दुपारी दहावीचा निकाल जाहिर झाला. परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आनंदात असतानाच त्यांना आणखी एक सुखद धक्का अनुभवयाला मिळाला. परीक्षेत पास झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे स्वतः आपल्या घरी आल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह पालक ही आश्चर्यचकित झाले. अनपेक्षितपणे घडलेल्या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या भावना दाटून आल्या. तर पालकही भारावून गेले. आपला मुलगा, मुलीला मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी स्वतः खा.श्रीनिवास पाटील हे आपल्या घरी आल्याचे पाहून पालकांची छाती गर्वाने फुगून गेली.
    नावडी येथील शिवानी अमोल पाटील या विद्यार्थीनीने दहावीत ९८.४० टक्के गुण मिळवले आहेत. ही माहिती मिळताच खा.पाटील यांनी तिच्या घरी नावडी येथे जावून तीचे अभिनंदन केले. त्यानंतर खा.पाटील यांनी परीक्षेत यश संपादन केलेल्या बहुले, मारुल हवेली, नावडी व टेळेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या देखील घरी जावून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देवून त्यांना पेढा भरवला. त्यांच्या पाटीवर शाब्बासकीची थाप टाकत त्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणारे त्यांचे आई-वडिलांचा देखील खा.पाटील यांनी सत्कार केला. 

खा. श्रीनिवास पाटील हे त्यांच्या विद्यार्थी दशेत असताना शाळेत अव्वल राहिले आहेत. त्यांचे शिक्षणाप्रती प्रेम कायम असून त्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असल्याचे वेळोवेळी दिसून येते. त्यांनी दिलेल्या या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना नवी उर्जा आणि प्रोत्साहन देणारे आहे. तर आपल्या मुला-मुलींचे होणारे कौतुक पाहून पालकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. 

नावडी: शिवानी पाटील हीचा सत्कार करताना खा.श्रीनिवास पाटील

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात