माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींना थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मंजूर*



 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींना थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मंजूर* 

·       राज्यातील 383 नगरपरिषदा/नगरपंचायतींना मिळणार थकीत अनुदान

·       कराड व मलकापूर नगरपालिकेला अनुक्रमे रु. ३८ लाख व ५८ लाख मिळणार  

 *कराड:* राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाकरिता राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते. राज्यातील एकूण ३८३ नगरपरिषदा/नगरपंचायतीं यांना 2018-19 पासून हे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मिळाले नव्हते. यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे मागणी केली होती. शासनस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे राज्यातील ३८३ नगरपरिषदा/नगरपंचायतींना 2018-19 वर्षातील थकीत मुद्रांक शुल्क अनुदान मिळणार आहे.

        राज्यात एकूण 241 नगरपरिषदा व 144 नगरपंचायती अशा एकूण 383 नगरपरिषदा/नगरपंचायती आहेत. शासनाने यापूर्वी राज्यातील महानगरपालिकांना 1% मुद्रांक शुल्क अनुदान वितरित केले आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व नगरपरिषदा/नगरपंचायती यांना अंदाजे रु. 577 कोटी मुद्रांक शुल्क अनुदान थकीत होते. महानगरपालिकांप्रमाणेच नगरपरिषदा/नगरपंचायती देखील वितरित करणे आवश्यक होते. याची आवश्यकता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली व पाठपुरावा केला.  त्यानुसार राज्य शासनाकडून नगरपरिषदा/नगरपंचायतींना २०१८-१९ या वित्तीय वर्षातील रु. ७० कोटी थकीत अनुदान वितरित करण्याबाबतचा शासन आदेश 6 जून 2023 रोजी (आदेश क्र. नपप्रसं/2023-24/ मुद्रांक शुल्क अनुदान/का-5/3040) निर्गमित केला.   

या आदेशानुसार सातारा जिल्हयातील नगरपरिषदा/नगरपंचायतींना एकूण रक्कम रु. 3.41 कोटी तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कराड नगरपालिकेला रु. 38 लाख तर मलकापूर नगरपालिकेला रु. 58 लाख इतकी रक्कम वितरीत झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक