पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत आढावा घेतला.*सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
*पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत आढावा घेतला.*सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
*पालखी सोहळ्यासाठी सुविधा पुरवण्याबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रशासनाला निर्देश दिले.*
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सातारा जिल्ह्यातून १८ जून ते २३ जून या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने तयारीसंदर्भात पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज लोणंद (ता. खंडाळा) येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली.
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी आणि ज्या ठिकाणावरून पाणी टँकरमध्ये भरले जाणार आहे, त्याची पाहणी करावी, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केली. तसेच आरोग्य विभागाने जास्तीत जास्त पथके फिरती ठेवावी, म्हणजे तात्काळ वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवता येतील, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी दिले. याशिवाय पालखी सोहळ्यासाठी जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा. प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्यात येणार आहेत, त्याची माहिती देणारे फलक जागोजागी लावावे, अशा सूचनाही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केल्या.
बैठकीनंतर निराघाट व लोणंद येथील पालखी तळाची पाहणी करून मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी या दोन्ही ठिकाणी वृक्षारोपण केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment