ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले सरांच्या निधनानं उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मौलिक कार्य करणारं, राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणारं महान व्यक्तिमत्वं हरपलं आहे. उच्च शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा उंचावण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या युवकांना, ज्येष्ठांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी, राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका सरांनी बजावली.

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याशी जवळचं नातं असलेल्या डॉ. ताकवले सरांनी तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु, 'नॅक' या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचं काम केलं. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. डॉ. ताकवले सरांचं निधन ही राज्याच्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Comments
Post a Comment