मसूर येथील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आज झाले वाहतुक कोंडीची डोकेदुखी पूर्ण थांबणार
*आज मसूर येथील मसूर उंब्रज रोडवरील महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील साहेब व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या सतत पाठपुराव्याने नव्याने बांधलेल्या रेल्वे फाटकवरील उड्डाणपूलाचे आज मसूर व परिसरातील नागरिक,विविध गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले,*
या उड्डाणपुलाचे बऱ्याच दिवसापासून काम पूर्ण झाले होते तरीसुद्धा प्रशासनाच्या अडमुटपनामुळे,की राजकीय श्रेय वादामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता त्यामुळे रेल्वे फटका वर वाहतुकीची कोंडी होत होती तसेच दुर्घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागत होता, आज मसूर येथील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ तसेच कांबिरवाडी, कवठे, कोणेगाव, खराडे, वाण्याचीवाडी, हणबरवाडी, येथील सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ या सर्वांनी मिळून आज उड्डाणपूला चे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, सुनील पाटील, कोणेगावचे सरपंच रमेश चव्हाण, कांबिरवाडीचे सरपंच महेंद्र बोले, वाण्याचीवाडी चे माजी सरपंच प्रदीप मोरे, खराडे येथील शरद बर्गे, मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे,प्रा.कादर पिरजादे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शहाजीराजे जगदाळे, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, .ग्रा.प. सदस्य रमेश जाधव, प्रमोद चव्हाण,मा सदस्य महेश घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत पाटील, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जमीर मुल्ला, बापूसाहेब जगदाळे, अरुण कांबिरे, शिवाजी माने सर, सचिन चव्हाण, समाधान चव्हाण, अशोक कांबिरे, राजू पवार, निवास चव्हाण, हिमांशू शहा, जितेंद्र निकम, रवी जाधव सर, सागर लंगडे, वसंत पाटोळे तात्या, प्रताप जगदाळे, व्यंकटराव शेडगे, तसेच विविध गावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment