माता-भगिनींच्या कर्तृत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांची कार्यक्षमता, जिद्द, चिकीटी, खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी ती एक आदिशक्ती असून सर्वांना प्रेरित करणारी शक्ती आहे. त्यामुळे महिलांच्या पंखांना बळ द्या असे आवाहन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

      माता-भगिनींच्या कर्तृत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांची कार्यक्षमता, जिद्द, चिकीटी, खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी ती एक आदिशक्ती असून सर्वांना प्रेरित करणारी शक्ती आहे. त्यामुळे महिलांच्या पंखांना बळ द्या असे आवाहन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.
      श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा ३६० यांच्या तर्फे देशसेवा बजावत असताना विरमरण आलेल्या जवानांच्या वीरपत्नी-वीरमातांचा सन्मान तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा कृषीलक्ष्मी, उद्योगलक्ष्मी व आदिशक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कराड येथे सौ.वेणूताई चव्हाण स्मारक सांस्कृतिक सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्षा रचना पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, माई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता साळुंखे. माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, अ‍ॅड.विद्याराणी साळुंखे, अर्चना पाटील, प्रा.उमाताई हिंगमिरे, फरिदा इनामदार, विद्या मोरे, कराडच्या गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, पाटणच्या गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर, पाटणच्या माजी सभापती उज्वला जाधव, मल्हारपेठच्या सरपंच धनश्री कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      श्रीनिवास पाटील म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत, धीटपणे व्यक्त होत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी असल्याचे दिसून येत आहे. उद्योग, शेती, नोकरीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. आज ती आत्मविश्वासाने व्यक्त होत आहे. महिला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्वच स्तरांवर सक्षम होतं स्वयंसिद्ध झाल्या तरच त्यांचा ख-या अर्थाने सन्मान होईल.
        सारंग पाटील म्हणाले, महिलांच्या योगदानाबद्दल कौतुक केले जात नाही. त्यांच्या कष्टाची दखल घेतली गेली पाहिजे. अलिकडे चित्र बदलत असून प्रत्येक ठिकाणी त्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यांचे कर्तृत्व अधोरेखित होत आहे. त्यांना योग्य संधी, प्रोत्साहन व पाठबळ दिल्यास त्या सामाजिक बदलाचे व विकासाचे प्रमुख माध्यम ठरतील.
      प्रारंभी स्वागत प्रशांत लाड यांनी केले. आभार प्रसाद नेहे यांनी मानले. कार्यक्रमास कराड, पाटण तालुक्यासह जिल्ह्यातील महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती. 

माता-भगिनी कौतुकाने भारावल्या...
चूल आणि मूल या पुरती मर्यादित राहणारी महिला आता प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत आहे. शेती, उद्योग, नोकरी करून आपल्या कुटुंबालाही सावरत आहे.  त्यांच्या समर्पित भूमिकेला अपार कष्टाची किनार आहे. त्यांनी दिलेल्या विविध क्षेत्रातील योगदानाचा श्रीनिवास पाटील फाउंडेशन व युवा ३६० ने गुणगौरव केला. या कौतुकाने उपस्थित माता-भगिनी भारावून गेल्या. 

फोटो-
कराड : महिला सन्मान व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित खा.श्रीनिवास पाटील, सारंग पाटील,  रचना पाटील व इतर

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक