मा नगरसेवक श्री सौरभ पाटील(तात्या) यांच्या संकल्पनेतुन स्व यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ अंतर्गत "पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ" हा अभिनव उपक्रम टाऊन हॉल येथे सुरू असून सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
मा नगरसेवक श्री सौरभ पाटील(तात्या) यांच्या संकल्पनेतुन स्व यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ अंतर्गत "पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ" हा अभिनव उपक्रम टाऊन हॉल येथे सुरू असून पुस्तकांच्या बागेमध्ये मूळच्या कराडच्या व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या सौ गौरी सागांवकर देशमुख यांनी भेट दिली असता त्यांचे यशवंतराव चव्हाण साहेब लिखित सह्याद्रीचे वारे हे पुस्तक देऊन स्वागत करताना मा नगरसेवक श्री सौरभ पाटील(तात्या), अक्षरगुरू श्री राहुल पुरोहित(सर), श्री सतीश भोंगाळे, श्री मंगेश वास्के, श्री गणेश कांबळे, श्री अजय सूर्यवंशी, श्री सुधाकर गायकवाड, श्री गणेश हिंगमीरे व सहकारी.
सौ गौरी सागांवकर देशमुख "अ अमेरिकेचा" या युट्युब चॅनेल्सच्या संस्थापिका असून नगरवाचनालयाच्या माजी सभासद आहेत. त्या युट्युबच्या माध्यमातून भारत, अमेरिका मधील विविध सण, उत्सव,संस्कृती,कुटुंबीक जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती याविषयी माहिती देत असतात. त्यांचे देश परदेशात लाखो फॉलोअर्स असून त्या सध्या सुट्टीनिमित भारतात आल्या असून त्यांना "पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ" या अभिनव उपक्रमा विषयी माहिती मिळताच त्यांनी बागेस व ग्रंथालयास भेट देऊन शालेय बलमित्रांशी सवांद साधला. बाल मित्रांनी आमिरेकेतील शिक्षण पद्धती, उत्सव संस्कृती यासह विविध प्रकारचे प्रश्न करून त्याची उत्तरे जाणून घेतली. तसेच "पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ" या उपक्रमास भेट देत बालमित्रांशी सवांद साधता आला याबद्दल मनस्वी आनंद झाला. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील आठवणीना उजाळा मिळाला व केलेले स्वागत, आदरातिथ्य याबद्दल सौरभतात्या व सहकाऱ्यांचे आभार मानून धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment