कराड येथे शिवसेना पक्षातर्फे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सांगली सातारा कोल्हापूर तीन जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हिंदवी विचारांचा प्रभाव प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामनात कणाकणात रुजावा यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनानुसार कराड येथील स्वर्गीय वेणूताई चव्हाण सभागृहात लक्षवेध सव. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदवी विचारांच्या जागर होण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सांगली सातारा कोल्हापूर येथील सुमारे 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या वकृत्व स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शिवसेना सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते उपजिल्हा संघटिका सुलोचना पवार कराड दक्षिण तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव तालुका प्रमुख सूर्यकांत पाटील कराड शहर प्रमुख राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी गोविंद उबाळे प्रदीप अहिरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या वकृत्व स्पर्धेतून सातारा सांगली कोल्हापूर आदि जिल्ह्यात शिवसेनेचा कार्यकर्ता तयार व्हावा हा उद्देश ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
स्व बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकात पोहोचण्यासाठी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले
या वकृत्व स्पर्धेतील विचारांचा जागर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून जे काम करीत आहेत त्याला नक्कीच बळकटी मिळेल असा आत्मविश्वास कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी व्यक्त केला तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार मानले
या वकृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव शिवसेना सातारा जिल्हा उपप्रमुख अक्षय मोहिते कराड शहरप्रमुख राजेंद्र माने कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक गजेंद्र कांबळे किरण पाटील सो स्मिता हुलवार निशांत ढेकळे विनोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आला
लक्षवेध शिवसेना पक्षातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक भिकाजी मूगदुम सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक अधिक पाटील तर सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक विराज खराडे यांनी मिळवला महिला विशेष वक्ता प्रथम क्रमांक सातारा येथील शारदा जाधव यांचा गौरव करण्यात आला या वकृत्व स्पर्धेत पंच म्हणून शिवराज अनदेकर यशवंत सुतार सुधीर एकांडे यांनी काम पाहिले
Comments
Post a Comment