कराडमध्ये कर्नाटक विजयाचा युवक काँग्रेसकडून आंनदोत्सव साजरा* सह्याद्री वार्ता न्यूज
*कराडमध्ये कर्नाटक विजयाचा युवक काँग्रेसकडून आंनदोत्सव साजरा* सह्याद्री वार्ता न्यूज नेटवर्क कराड असलम मुल्ला
कराड : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळविले यामुळे देशभरातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यानिमित्त कराड शहरात युवक काँग्रेसकडून दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मनोहर भाऊ शिंदे,अध्यक्ष कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, युवा नेते इंद्रजित दादा चव्हाण, दिग्विजय पाटील अध्यक्ष, कराड दक्षिण युवक काँग्रेस, झाकीर पठाण प्रदेश उपाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमोल नलावडे ,सुहास थोरात ,देवदास माने ,गणेश सातारकर,आमिर कटापुरे, योगेश लादे,गणेश गायकवाड, राहुलराज पवार, अनिल माळी, शरद पाटील, विजय पाटील, मुबिन बागवान, शाहरुख मुल्ला, शरीफ मुल्ला, नईम पठाण, श्रीतेज लादे, अजीम मुजावर, मुकुंद पाटील, संग्राम काळभोर, किरण पांढरपट्टे,ओमकार बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी कर्नाटकात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत सभा घेतल्या, पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचारी भाजपा सरकारचा पर्दाफाश केला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सीमा भागातील बेळगांव ग्रामीण, बेळगाव उत्तर, चिक्कोडी-सदलगा, निपाणी या चार उमेदवारांचा जोरदार प्रचार करीत सभा घेतल्या, रॅली काढल्या या चार उमेदवारातील तीन उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. यामुळे कराड शहरात युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी दत्त चौक येथे एकत्र येत काँग्रेस पक्षाच्या, पृथ्वीराज बाबांच्या तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या नावाने घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
Comments
Post a Comment