सारंग पाटील यांचा शनिवारी वाढदिवस सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

सारंग पाटील यांचा शनिवारी वाढदिवस सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 

      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सनबीम शिक्षण समूह व श्रीनिवास पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांचा शनिवार दि.१३ मे रोजी ५१ वा वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त सारंग पाटील हे हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी गोटे, कराड येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. 

    सारंग पाटील यांचा वाढदिवस कराड येथे साधेपणाने साजरा होणार आहे. ते शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत गोटे, कराड येथील ‘लोकसेवा’ जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे अथवा शक्य असल्यास समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक