हजारो कोटी रूपयाची उलाढाल करणारे पुण्यातील *उद्योगपती झवेर पुणावाला* यांचा *ड्रायव्हर गंगादत्त* याचे निधन झाले
हजारो कोटी रूपयाची उलाढाल करणारे पुण्यातील *उद्योगपती झवेर पुणावाला* यांचा *ड्रायव्हर गंगादत्त* याचे निधन झाले
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
. गंगादत्तचे निधन झाले तेव्हा पुणावाला पुण्यात नव्हते. एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला होते .गंगादत्त निवर्तल्याची बातमी समजताच त्यांनी तत्काळ सर्व बैठका रद्द केल्या. " मी येइ पर्यत अत्यंसंस्कार करू नका " अशी विनंती गंगादत्तच्या कूटूबींयाना दुरध्वनीवरुन करत लगेच एका खाजगी हेलीकॉप्टरने पुण्याकडे धाव घेतली. आयुष्यभर ड्रायव्हर म्हणून काम करीत असुनही आपल्या दोन्ही मुलांना पदवीपर्यंत शिकवणारा,.. इतकेच नाहीतर आपल्या मुलीला सी .ए .बनवण्यासाठी प्रोत्साहन देणारा गंगादत्त व सी. ए. होवून वडीलांची इच्छा पुर्ण करणारी त्यांची मुलगी अशा या कष्टाळू व जिद्दी गंगादत्त कुटूंबीया बद्दल पूणावाला यांना अभीमान होता. गंगादत्तच्या आठवणी जागवतच पुण्यात परतलेल्या पुणावाला यांनी गंगादत्त चालवत असलेल्या *लिमोझीन गाडीतूनच* त्याची *अंतयात्रा* काढण्याची ईच्छा त्यांच्या कुटूबींयाकडे व्यत्क केली. या अचबिंत करणार्या मागणीने गंगादत्तचे कुटूबिंय भारावुन गेले. साश्रू नयनानीं त्यांनी होकार देताच तत्काळ लिमोझीन गाडी फुलांनी सजवली. यानंतरची कृती पुणावाला यांची थक्क करणारी होती. गंगादतचा शेवटचा प्रवास लिमोझीन मधून सुरु झाला. आयुष्यभर आपली गाडी चालवणार्या गंगादत्तच्या घरापासून ते *स्मशानभुमीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासात पुणावाला यांनी स्वता: गाडी चालवत अनोखी आदराजंली वाहीली.* कृतज्ञतेच्या या अनोख्या सारथ्यातून व्यक्त झालेल्या माणूसकीचा गहीवर उपस्थीतांना हेलावून गेला. उदरनिर्वाहासाठी नोकरीतून, व्यवसायातून पैसे सगळेच कमवतात. मात्र ज्याच्या जोरावर आपण कमावतो त्याच्या विषयी *कृतज्ञता* बाळगणारे कीती जण असतात. अशा उद्योगपतीस आमचा सलाम। 🙏🙏👏👏
Comments
Post a Comment