बैलगाडा शर्यतींसंदर्भात विधिमंडळानं केलेले कायदे वैध ठरवत बैलगाडा शर्यतींची मान्यता कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह, आनंददायी आहे.
बैलगाडा शर्यतींसंदर्भात विधिमंडळानं केलेले कायदे वैध ठरवत बैलगाडा शर्यतींची मान्यता कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह, आनंददायी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं शेती संस्कृतीचा महत्त्वाचा घटक असलेली बैलगाडा शर्यतीची परंपरा अधिक समृद्ध होईल. बैलांची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. बैल हा शेतकऱ्यांचा साथीदार, कुटुंबातील सदस्य समजला जातो. शेतकरी आणि बैलांचं हे नातं यापुढे अधिक वृद्धिंगत होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल बैलगाडा चालक, मालक शेतकरी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी बांधवांचं अभिनंदन! शर्यतीचे नियम पाळून, बैलांची योग्य काळजी घेत आपण ही परंपरा, संस्कृती जपूया.
अजित पवार
Comments
Post a Comment