कृष्णा विश्व विद्यापीठात २० मे पासून राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
कृष्णा विश्व विद्यापीठात २० मे पासून राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन
देशभरातील ४०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित राहणार; मान्यवर तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन
कराड, ता. १६ : कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायॉलॉजि सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात २० व २१ मे रोजी राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. "ग्रामीण आणि शहरी भारतातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग-अकादमी संमेलन" हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असून, जैवतंत्रज्ञान विकास या विषयावर आधारित आहे.
कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनासाठी शनिवार दि. २० मे रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर प्रमुख पाहुणे व कृषी आणि नैसर्गिक संसाधने अर्थशास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सतना – मध्यप्रदेश येथील ए. के. एस. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, मुंबई येथील होमी भाभा नॅशनल इन्स्टिटयूटचे प्रा. डॉ. जे. बी. जोशी, आदी मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत देशभरातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ४० हून अधिक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
परिषदेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पोस्टर स्पर्धा, मॉडेल मेकिंग स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक छायाचित्रण स्पर्धा, बायोटून स्पर्धा यांचा समावेश आहे. दोन दिवसीय परिषदेमध्ये देशातील विविध भागामधून विद्यार्थी सहभागी होणार असून, यामध्ये केंद्र सरकारच्या राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पटना), एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (ग्वाल्हेर), डॉन बॉस्को विद्यापीठ आसाम, सिक्कीम विद्यापीठ, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना, पंजाब, रिजनल सेंटर फॉर बायोटेकनॉलॉजि, फरिदाबाद, सेंट झेवियर कॉलेज अहमदाबाद, गुजरात टेकनॉलॉजि विद्यापीठ, गुजरात, शूलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेकनॉलॉजि, सोलान, हिमाचल प्रदेश, संजीवनी कॉलेज, कोपरगाव, वाडिया कॉलेज, पुणे, ग्रीन विटल बायोटेक, पुणे, महाराष्ट्र येथील सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दोन दिवसीय परिषदेमध्ये जगभरातील विविध देशातून, भारतातून आणि राज्यातून आमंत्रित वक्ते ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करतील. यामध्ये डॉ. मंगेश पाटगावकर (माजी विभागप्रमुख, जैवतंत्रज्ञान विभाग के. आई. टी., कोल्हापूर), डॉ. ओम प्रकाश (सिंबायोसिस विद्यापीठ, पुणे), डॉ. शिरीष बेलापुरे (आई. ए. इ. मुंबई), डॉ. तृप्ती गोखले (बिट्स पिलानी दुबई), डॉ. बालाजी आगलावे (डायरेक्टर, फ्लोरिडा ए. जी. संशोधन संस्था), डॉ. समीर डामरे (सी. एस. आई. आर., एन. आई. ओ. गोवा), डॉ. हुंगुन्ड (के. एल.इ. हुब्बळी, कर्नाटक), डॉ. जावेद शेख (गुजरात), डॉ. तांझिमा यियास्मिन (बांगलादेश), डॉ. शीतल पेडणेकर (मुंबई), डॉ. आनंद भादुलकर (डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि, गव्हर्नमेंट ऑफ गुजरात, गांधीनगर), डॉ. कीर्तिकुमार सातपुते (सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया पुणे), डॉ. गिरीश महाजन (हाय मेडिया, मुंबई), डॉ. अनंतकुमार नाजन (इंनोवेशन फेलो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र) इत्यादींचा समावेश आहे.
या परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या (ता. २२) समारोप सत्राला राज्याचे उच्चशिक्षण व तंत्रज्ञान मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेस ११ वी ते पदवी, पदव्युत्तर आणि पी. एच. डी. चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेसशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा विद्यापीठाचे डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेसचे प्राचार्य डॉ. गिरीष पठाडे, मायक्रोबायॉलॉजि सोसायटीचे अध्यक्षडॉ. ए. एम. देशमुख यांनी केले आहे.
Comments
Post a Comment