कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड

14 केआरडी 4 कराड : छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन प्रसंगी रणजितनाना पाटील, उमेश शिंदे, प्रमोद तोडकर, दत्ता तारळेकर, स्वाती पिसाळ, विद्या मोरे व अन्य.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी येथील शंभूतीर्थावर उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभरात शहरातील मान्यवरांनी उपस्थिती लावून अभिवादन केले.
येथील शंभूतीर्थावर (जुना भेदा चौक) छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने जयंती सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील, अनिलशेठ खुंटाळे, सागर आमले, उमेश शिंदे, उदय हिंगमिरे, दत्ता तारळेकर, धवल जाधव, संजय भादुले, दीपक मोरे, सचिन राऊत, सुनील शिंदे, संजय उर्फ जॉन्टी थोरात, संजय थोरात, सचिन वास्के, प्रतापराव इंगवले, प्रमोद तोडकर, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पिसाळ, विद्या मोरे, रूपाली तोडकर, हिंदवी तोडकर आदी उपस्थित होते. दिवसभरात मान्यवरांनी उपस्थित राहात अभिवादन केले. स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. सायंकाळी अष्टगंध ढोलताशा पथकाने मानवंदना दिली. यावेळी शिव-शंभूप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

स्मारकाच्या कॉलममध्ये पवित्र नद्यांचे पाणी व माती
स्मारकाच्या पहिल्या कॉलमचे काम सुरू आहे. आज जयंतीचे औचित्य साधून या कॉलममध्ये गंगा, नर्मदा, कृष्णा, कोयना नद्यांचे पाणी, रामेश्वर येथील पवित्र पुंडातील पाणी, येती, रायगड व शिवनेरी किल्ल्यावरील पाणी व माती अर्पण करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात