दानशूर बंडो गोपाळा विद्यालय वाठार माजी विद्यार्थी स्नेह मेळावा जुन्या गोष्टींना दिला उजाळा
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व वसंतराव उर्फ डी.के.पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,वाठार एस.एस.सी 1988/1989 च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वैष्णवी हॉटेल येथे पार पडला . सदर स्नेह मेळाव्यास त्या वेळचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्था रायगड विभाग चे माजी विभागीय अधिकारी मा.नायकवडी आर.एल साहेब तसेच त्या वेळचे शिक्षक वृंद श्री. कमाने सर,श्री. जानुगडे ए.आर.श्री.पवार सर,श्री यादव सर, सौ.कुलकर्णी मॅडम सध्याचे,स्कूल कमिटी सदस्य मा.अधिकराव पाटील, मा.श्री.प्रभाकर पाटील, प्राचार्य श्री.कांबळे एस.टी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीस सर्व शिक्षक,स्कूल कमिटी सदस्य यांचे गेट वर औक्षण करून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तडाखे सर यांनी केले . वर्गातील जे विद्यार्थी सध्या या जगात हयात नाहीत त्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.माझी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले जुन्या शालेय प्रसंगाना उजाळा दिला सर्व माजी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल संयोजक व सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .त्या वेळचे काही प्रसंग सांगितले .समाजाचे ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यालयात भौतिक सुविधा पूर्ततेसाठी 75000रू. देणगी स्वरुपात शाळेस दिल्याबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे धन्यवाद मानले ही चळवळ अशीच चालू ठेवावी विद्यार्थ्यांनी संपर्कात राहून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे . श्री.कांबळे सर यांनी सध्या शाळेत चालू असलेल्या भौतिक सुविधांची,शालेय उपक्रमांची माहिती दिली.ग्रामस्थ,देणगीदार, माजी विद्यार्थी यांचे सहकार्यानेच विद्यालयात वर्षभरात 2800000 रूपया पर्यंतची कामे पूर्ण करता आली. सन 1988/89 च्या एस.एस. सी विद्यार्थ्यांनी विद्यालयात दिलेल्या बहुमोल देणगी बद्दल सर्व माजी विद्यार्थी,ग्रुप लीडर यांचे आभार मानले.श्री.अविनाश पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी,स्कूल कमिटी सदस्स्य यांचे आभार मानले.
सभेचा कार्यक्रम संपल्या नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेट दिली त्या वेळच्या आपल्या वर्ग खोलीतील बाकावर बसून आनंद अनुभवला.इमारतीची पाहणी केली .अटल टिंकरिंग लॅब मधील साहित्य,घेतली जाणारी प्रात्यक्षिके यांची माहिती घेतली.पुतळा परिसरात ग्रुपचे फोटो काढले.वेगळ्या आनंदात सर्वजण पुढील कार्यास मार्गस्थ झाले.
Comments
Post a Comment