कराड बाजारसमितीचा विजयाचा गुलाल घेऊन पृथ्वीराज बाबा कर्नाटक ला रवाना*



 *कराड बाजारसमितीचा विजयाचा गुलाल घेऊन पृथ्वीराज बाबा कर्नाटक ला रवाना* 

 सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला
*कराड :* कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांची कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस पक्षाने नुकतीच नेमणूक केली आहे.  काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या देशभरातील 40 दिग्गज काँग्रेस नेते कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत पूर्ण वेळ देणार असल्याचे जाहीर केले होते. व त्यानंतर कराड तालुक्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद निहाय मतदारांच्या मेळाव्यात आ. चव्हाण यांनी या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगत आणली व बाजारसमितीची निवडणूक गावागावात घराघरात पोहचली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल ने 12 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवीत विजय खेचून आणला.

आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अभद्र युतीला सभासदांनी नाकारले असून शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात रहावी अशी आमच्या पॅनलची असलेली अपेक्षा आज सभासदांनीच पूर्ण केली. प्रत्येक पद आपल्याच घरात पाहिजे या विचारला सभासदांची चपराक या निवडणुकीच्या निकालाने बसली आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक