उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने . मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एच. आय. व्ही. ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी "किसीका भाई किसीकी जान" चित्रपटाचा आनंद लुटला.
उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने . मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एच. आय. व्ही. ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी "किसीका भाई किसीकी जान" चित्रपटाचा आनंद लुटला.
पुणे
उन्हाळा सुट्टी निमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने मतिमंद, अंध, अपंग, कॅन्सर, एच. आय. व्ही. ग्रस्त, अनाथ 500 मुलांनी "भाईजान" चित्रपटाचा आनंद लुटला. बहगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये अभिनेता सलमान खान याचा अभिनय असलेला "किसीका भाई किसीकी जान" या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट एक मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आला.
यावेळी आयनॉक्सचे सिध्दार्थ मनोहर व अंकुर कटियाल यांनी मनजितसिंग विरदी यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. याचावेळी मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स, सँडविच, चॉकलेट्स, विशलेरी, पाण्याच्या वॉटल्स, आणि गुलाबपुष्प दउन मनजितसिंग विरदी यांनी मुलांचे स्वागत केले.
अभिनेता सलमान खान यांचा अभिनय मुलांना आवडतो, त्यामुळे मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने या मुलांना या चित्रपटाचे खास शोचे आयोजन केले होते. गेली 24 वर्षापासून मनजितसिंग विरदी फाऊंडेशन विशेष मुलासाठी चित्रपटाचे आयोजन करते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट संचालित जय गणेश पालकत्व योजना,अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, सेंट मार्गारेट, सावली, संतुलन निवासी पाषाण, झेप रेमेडियल लर्निग सेंटर, अद्वैत परिवार, EPS इमॅन्युएल पब्लिक स्कूल, रिदम डान्स अकॅडमी, अंजुमन गर्ल्स, जॉय किड्स या संस्थेतील मुलांनी सहभाग घेतला आणि चित्रपटाचा आनंद लुटला.
यावेळी झोन 1 चे उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, बुधानी वेफर्सचे मालक अरविंद बुधानी, गुरुद्वारा अध्यक्ष भोला सिंग अरोरा, जिल्हापरिषद सदस्य अंकिता पाटील, पंजाबी क्लचर असोशिएशन सर्व सभासद, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख, भारतीय जनता पक्ष युवती आघाडी सरचिटणीस समृध्दी मोहोळ, प्रकाश शेळके, यशवंत नटगम उपस्थित होते.
Comments
Post a Comment