सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड( असलंम मुल्ला )सजयनगर ,शेरे येथील ग्रामदैवतांची ६ पासून यात्रा
संजयनगर ,शेरे येथील ग्रामदैवतांची ६ पासून यात्रा
कराड : संजयनगर ,शेरे ता .कराड येथील ग्रामदैवत श्री मौजाई देवीची व हनुमान देवाची गुरुवार , ६ ते शुक्रवार दि.७ यात्रा होत आहे.त्यानिमित्त यात्रा समितीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनानंतर दुसऱ्यांदा यात्रा होत आहे.भाविकांनी व ग्रामस्थांनी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या पालखी मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा, सांगली ,कोल्हापूर,पुणे गुजरात ,कर्नाटक जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्री.मौजाई देवी हे श्रध्दास्थान आहे. गावात पूर्व बाजूस गावात मंदिर असून भाविक व लोकवर्गणीतून मंदिर परिसराचा कायापालट झाला आहे. दर पौर्णिमेस भक्तांची गर्दी असते. तसेच गावातील मंदिरात पुरण पोळी आंबील नैवेद्य दिल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक सुरवात होते.त्यानंतर पालखीची गुलाल - खोबऱ्याचा उधळणीत मिरवणूक होणार आहे.त्या दिवशी रात्री विविध गावातून बँड कलापथक कार्यक्रम होणार आहे. तमाशा व आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे नियोजित केले गेले आहे. असे श्री. मौजाई देवी यात्रा कमीटीचे अध्यक्ष अजित जाधव यांनी माहिती दिली.
Comments
Post a Comment