Posts

Showing posts from December, 2024

*दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

*दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु* *शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*                 सातारा दि.31 : दुचाकी वाहनासाठी डीटी  ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 1 जानेवारी 2025 रोजी प्रादेशिक  परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील.  दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 1 जानेवारी 2025 ऑक्टोबर रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   3 जानेवारी 2025 रोजी दुचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील.   ज्या आकर्षक  कमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल.  एकापेक्षा ...

कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ येथील नव्या कॅम्पसचे रविवारी भूमिपूजन

Image
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शिरवळ येथील नव्या कॅम्पसचे रविवारी भूमिपूजन  कराड, ता. २१ : शिरवळ (ता. खंडाळा) येथील शिंदेवाडीमध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नव्या भव्य कॅम्पसची उभारणी करण्यात येणार आहे. या नव्या कॅम्पसचे भूमिपूजन सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजून ११ मिनीटांनी, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकीत असलेल्या कृष्णा विश्व विद्यापीठाचा नवा कॅम्पस शिरवळजवळच्या शिंदेवाडीत साकारला जाणार आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर व निरा नदीच्या काठालगत सुमारे ५० एकरच्या विस्तीर्ण जागेवर साकारण्यात येणाऱ्या या कॅम्पसमध्ये, सुमारे ६५० खाटांचे शिक्षण रुग्णालय उभारले जाणार आहे. तसेच २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय, आयुर्वेदीक, दंतविज्ञान, फिजीओथेरपी, नर्सिंग, फार्मसी कॉलेजची उभारणी केली जाणार आहे. या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये विद्यार...

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

Image
कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर कराड, ता. १२ कराड वार्ता न्युज : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.  शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.  कृष्णा कारखान्याच्या...

अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा कराड वार्ता न्युज ग्रुप

Image
अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा  नांदेड दि.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नुकताच झालेला महा पराभवाचा आढावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे घेतला. काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा भानुदास माळी यांच्या नेतृत्वात नांदेडचे भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड सह महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकारी यासाठी बोलावण्यात आले होते.      राजस्थानमध्ये जयपूर येथे देशाचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा 8 डिसेंबर रोजी दौरा होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महा पराभवाच्या संदर्भात चर्चा व आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भानुदास माळी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागातून व विविध क्षेत्रातील मोजके पदाधिकारी बोलावण्यात आले होते.या पदाधिकाऱ्यात नांदेड येथील काँग्रेस प्रदेश सचिव तथा भारतयात्री डॉ.श्...

अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा

अशोक गहलोत यांनी घेतला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभवाचा आढावा  नांदेड दि.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नुकताच झालेला महा पराभवाचा आढावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे घेतला. काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा भानुदास माळी यांच्या नेतृत्वात नांदेडचे भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड सह महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकारी यासाठी बोलावण्यात आले होते.      राजस्थानमध्ये जयपूर येथे देशाचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांचा 8 डिसेंबर रोजी दौरा होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महा पराभवाच्या संदर्भात चर्चा व आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भानुदास माळी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागातून व विविध क्षेत्रातील मोजके पदाधिकारी बोलावण्यात आले होते.या पदाधिकाऱ्यात नांदेड येथील काँग्रेस प्रदेश सचिव तथा भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांचा समावे...