राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त
*राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त कराड व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी कोपर्डे हवेली व हजारमाची विभागातील मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल मुंबई या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी ते रुग्ण आज हॉस्पिटलकडे राजयोग मंगल कार्यालय कोपर्डे हवेली येथून रवाना झाले असून, यावेळी रुग्णांना घेऊन जात असलेल्या लक्झरी बस मध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांनी रुग्णांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.*
*सदर शस्त्रक्रियेसाठी ट्रॅव्हल्स गाडीच्या माध्यमातून रुग्णांना ने - आन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, रुग्णांच्या राहण्याची जेवणाची चहापानाची सोय रुग्णालयामार्फत करण्यात आलेली आहे.*
Comments
Post a Comment