आ.च.विद्यालय मलकापूरची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड झेप..*.कराड वार्ता न्युज समुह
(*तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत)*
1. कुमारी वैष्णवी राजेंद्र पांढरपट्टे
गुण 254 - जिल्ह्यात 28 वी तसेच
तालुका गुणवत्ता यादीत 3 री
2. कु अनुज प्रकाश पाटील
गुण 238 - जिल्ह्यात 74 वा
3. कु शिवराय शरद शेवाळे
गुण 222 - जिल्ह्यात 153 वा
स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजे,या जिद्दीने श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ.च.विद्यालयाचे यशस्वीतेच्या घोडदौडीत तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.
1 कुमारी वैष्णवी राजेंद्र पांढरपट्टे गुण 254 - जिल्ह्यात 28 वी
2- कु अनुज प्रकाश पाटील
गुण 238 - जिल्ह्यात 74 वा
3- कु शिवराय शरद शेवाळे
गुण 222 - जिल्ह्यात 153 वा क्रमांक पटकाविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव श्री अशोकराव थोरात म्हणाले यशामागे विद्यार्थी शिक्षक पालक यांचा वाटा लाख मोलाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेचे महत्त्व ओळखून स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक श्री राजेंद्र पांढरपट्टे,सौ रूपाली राजेंद्र पांढरपट्टे, श्री प्रकाश पांडुरंग पाटील, सौ मंगल प्रकाश पाटील, श्री शरद वसंत शेवाळे,सौ सुजाता शरद शेवाळे यांचे व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे श्रीफळ गुलाब पुष्प प्रदान करून विद्यालयाच्यावतीने अभिनंदन केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका मा डॉ स्वाती थोरात अध्यक्ष पी.जी. पाटील उपाध्यक्ष बी.बी.पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक श्री संजय थोरात,श्री वसंत चंद्रु चव्हाण उपस्थित होते.या यशस्वी विद्यार्थ्यांना आर.एस.चौगुले, आर.आर.देसाई,एस.एस.लादे,कु एस.बी. खाडे,सौ. एस.आर. भोरे,सौ. एस.ए.पाटील,सौ.यु.ए.थोरात, सौ.ए.व्ही.पवार,एम.ए.म.लिंबारे,डी.
व्ही. कवळे, एम.व्ही.कांबळे,बी.जी. चौरे,आर.के.राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार ,उपमुख्याध्यापक श्री.ए.बी.थोरात पर्यवेक्षक श्री बी.जी.बुरुंगले, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस. ए.कुंभार यांनी केले.सूत्रसंचालन श्री एस.के.तांबवेकर यांनी केले, तर आभार सौ.एस.ए.पाटील यांनी मानले.
Comments
Post a Comment