हवेत तरी कशाला सारंग श्रीनिवास पाटील खासदार ..?* वेध व्यक्तित्वाचा आणि कर्तुत्वाचा

*हवेत तरी कशाला सारंग श्रीनिवास पाटील खासदार ..?* 

वेध व्यक्तित्वाचा आणि कर्तुत्वाचा 

▪️ पुत्र म्हणून *खा. श्रीनिवास पाटील साहेबांची सावली आहे का...?*
सातारा लोकसभा मतदारसंघात खा. श्रीनिवास पाटील साहेबांच्या सोबत सावली सारखे राहून श्री. सारंग पाटील गेल्या साडेचार वर्षात येथील सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्यात मिसळून काम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. सातारा लोकसभा मतदार संघ हा जिल्ह्याच्या ९ तालुक्यात विखुरलेला असून विस्तृत व दळणवळणाच्या दृष्टीने अवघड असलेला असा हा मतदारसंघ आहे. मात्र तरीदेखील खा. श्रीनिवास पाटील साहेबांनी आपल्या पक्षातील सर्व सहकारी आमदारांच्या सहकार्याने 'गाव तिथे विकासकाम' पोहचवण्याची किमया करून दाखवली आहे. त्यात श्री. सारंग पाटील हेही लोकसेवा कार्यालयाच्या माध्यमातून समन्वय, जनसंपर्क व गावभेटींच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या मदतीसाठी कार्यरत असतात. खासदार साहेब संसद अधिवेशन काळात दिल्लीत असतानाही त्यांच्या माघारी ते कार्यरत राहून कामात कधीही खंड पडू देत नाहीत आणि खासदार साहेबांच्या सुचनेनुसार लोकाभिमुख कामे अविरतपणे सुरू ठेवण्यात कायम अग्रेसर असतात. 

▪️ *खा. श्रीनिवास पाटील साहेबांच्या कार्यपद्धतीचा वारसा त्यांच्या अंगी आहे का..?* 
खा. श्रीनिवास पाटील साहेबांची कार्यपद्धती श्री. सारंग पाटील यांनी कार्यालयीन कामकाजामध्ये सहभाग घेऊन अवगत केली आहे. गेली साडेचार वर्षे खा.श्रीनिवास पाटील साहेबांच्या हाताखाली काम केल्याने तयार झालेले अष्टपैलू नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील साहेबांसारखाच सर्वांना न्याय देण्याचा, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा, सर्वत्र दांडगा जनसंपर्क ठेवण्याचा, अभ्यासू वृत्ती, सुसंस्कृतपणा बाळगण्याचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला आहे. ज्या यशवंत विचाराने, मा. शरद पवार साहेबांच्या विचाराने कारभार केला, अनेक वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच श्रीनिवास पाटील साहेबांची कार्यपद्धती सारंग पाटील यांच्या रूपाने पुढे चालू आहे.

▪️ *‘लोकसेवा’ जनसंपर्क कार्यालय कधी सुरू असते का..?*
लोकसेवा जनसंपर्क कार्यालयाची अनोखी कार्यपद्धती लक्षवेधक आहे. तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे स्वागत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले जातात. ही कार्यपद्धती लोकांना भावली आहे. हे कार्यालय कधीही बंद नसते. श्री. सारंग पाटील यांनी कार्यालयाचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत केले आहे. लोकांची कामे करून लोकसंग्रह जपण्याचे त्यांचे काम लोकसेवा कार्यालयाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष गावभेटींद्वारे अविरतपणे सुरु आहे. 
 
▪️ *प्रचारयंत्रणा आणि निवडणुकांचा काही अनुभव तरी आहे का...?*
खा. श्रीनिवास पाटील साहेबांची १९९९ व २००४ ची कराड लोकसभा निवडणूक व २०१९ ची सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रभावी प्रचारयंत्रणेमागे आणि विजयी निवडणुकांमधील तंत्रशुद्ध व्यवस्थापन कौशल्ये हे श्री. सारंग पाटील यांचेच होते, हे विसरून कसे चालेल.

▪️ *लिडरशिपचा काही अनुभव आहे ...?*
▫️१९९०-१९९५: एन.एस.यु. आयचे सक्रीय कार्य.
▫️१९९०-१९९२: एम.आय.टी.महाविद्यालयाच्या विद्यार्थी सभेच्या जनरल सेक्रेटरी (G.S) पदी निवड.
▫️१९९२-१९९३: एम.आय.टी. महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधी (U.R) पदी निवड.
▫️२००७-२०११: उपाध्यक्ष, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार.
▫️२०११-२०१४: सचिव (नियोजन आणि विकास), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश.
▫️२०१४ पासून: अध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश. 

▪️ *काही राजकीय कार्य आहे..?*
▫️ *सदस्य,* मतदारसंघ पुनर्रचना अभ्यास गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार. २००६ ते २००९.
▫️मतदारसंघ पुनर्रचना नियमांचा सखोल अभ्यास करुन माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे व महाराष्ट्रातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा भारतीय निवडणूक आयोगासमोर मांडावयाच्या आराखडा समितीचा सदस्य म्हणून मोलाचे काम केले.

▫️ *सचिव,* (नियोजन आणि विकास), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश - शरदचंद्र पवार, २०११ ते २०१४.
▫️राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे राज्यसभा खासदार व विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून करावयाच्या कामांचे प्रस्ताव कार्यकत्यांकडून मागवून नियमांचा अभ्यास करुन, महत्त्वाच्या ठिकाणी योग्य प्रस्तावांची पक्षातर्फे शिफारस करणे.

▫️ *अध्यक्ष,* माहिती तंत्रज्ञान सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश २०१४ पासून.
▫️पक्षाने स्थापन केलेल्या माहिती तंत्रज्ञान सेलचा पहिला प्रदेश प्रमुख म्हणून नियुक्ती. त्यानंतर राज्यपातळीपासून ते शेवटच्या बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटनेच्या विस्तार व व्यवस्थापनासाठी NCP-Connect या अद्ययावत माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा विकास केला. त्या माध्यमातून पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामधील समन्वय आणि संवाद अधिक सक्षम करत राज्यभर बूथ कार्यकत्यांची प्रशिक्षण शिबीरे – कार्यशाळा घेण्याचे काम आजतागायत सुरु.

▪️ *सामाजिक कार्य पण असावे लागते, ते आहे..?*
▫️ *अध्यक्ष:* श्रीनिवास पाटील चेरिटेबल फाऊंडेशन.
माजी राज्यपाल व लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांच्या प्रदीर्घ अनुभवाचा जनतेला अधिकाधिक लाभ व्हावा, अधिकाधिक लोकोपयोगी कामे करता यावीत यासाठी त्यांच्याच संकल्पनेतून आणि त्यांच्या लोकसेवेचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या प्रेरणेतून श्री.सारंग पाटील यांनी सन २०१० साली 'श्रीनिवास पाटील चॅरीटेबल फाउंडेशन' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. कुठलीही शासकीय मदत न घेता, स्वबळावर काम करणारी संस्था असा संस्थेचा आज नावलौकीक आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध लोकोपयोगी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, शिक्षक, महिला, शेतकरी व नव-उद्योजक व वंचितांना केंद्रस्थानी ठेवून फाउंडेशन विविध अभिनव उपक्रम, मदत व प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत ग्रामीण भागातील ६००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण, गरजू विद्याथ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नोकरीविषयक मार्गदर्शन, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात मोफत चारावाटप, टँकरने मोफत पाणी पुरवठा व तलावातील गाळ काढण्याचे कार्य, दुर्गम भागातील ३०० हून अधिक शाळांना मोफत संगणक संच व दुर्गम भागात पायपीट करत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, दुष्काळ निवारण, नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी-भूस्खलन पीडित व पूरग्रस्तांना मदत, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकातील शाळा व विद्यार्थ्यांना मदत, शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी माता भगिनींचा खऱ्या अर्थाने 'कृषीलक्ष्मीं'चा सन्मान त्यांच्या बांधावर जाऊन केला. गृहप्रक्रियेद्वारे छोटा-मोठा उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटातील भगिनींसाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा, मोफत विक्री स्टॉल्स, डिजिटल विक्री महोत्सव उपक्रम, विविध क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान व प्रोत्साहन,  देशासाठी आपला पुत्र, आपला पती बहाल करणाऱ्या वीरमाता, वीरपत्नींचा व कुटुंबांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान, युवकांसाठी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, Yuva 360° इंटर्नशिप उपक्रम व प्रशिक्षणासह विविध कृतिशील प्रकल्प कौशल्ये उपक्रम, डिजिटल युथ फेस्टिवल, युवोत्सव सातारा,  डिजिटल कन्या व सातारा आईन्स्टाईन अवॉर्डसारखे अभिनव उपक्रम, विज्ञान प्रयोग कार्यशाळा, शाळांना प्रयोग साहित्य भेट, कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक व अन्नधान्य किटचे वाटप, प्रशासनास आरोग्य सुरक्षाविषयक साहित्य, कोरोना काळात गरजूंना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना ‘साताराचे कोरोना हिरो’ उपक्रमातून प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ, महिला पोलीस अधिकारी व सहकारी यांच्यासाठी ताणतणाव कार्यशाळा, पालकत्व कार्यशाळा अशा विविध सामाजिक कार्यात संस्था श्री. सारंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. श्रीनिवास पाटील साहेबांच्या जनसेवेचा वारसा, लोकसेवेची दुर्दैम्य इच्छाशक्ती, उपक्रमांतील सातत्य आणि निखळपणा यामुळे जनसेवेचा हा प्रवाह श्री. सारंग पाटील यांच्या माध्यमातून अखंडीतपणे सुरु आहे.

▫️ *अध्यक्ष,* सनबीम एज्युकेशन अॅंड रिसर्च ट्रस्ट.
पुण्याच्या आसपास कार्यरत असलेले व्यावसायिक, विविध क्षेत्रातील तज्ञ, कंपन्यामधील व्यवस्थापक, अधिकारी, सल्लागार यांना एकत्रित करुन पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय नोकरी या क्षेत्रात येऊ पाहाणाऱ्या नवीन उद्योजक, पदवीधर, प्रशिक्षित युवकांना संधी मिळवून देणे, मार्गदर्शन ट्रस्टद्वारे केली जाते.

▪️ उच्चशिक्षित, *मग का नाही गेले परदेशात ?* 
▫️सन १९९७-१९९८ : अभियंता, सी-डॅक.
▫️सी-डॅक या भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संगणकीय संशोधन संस्थेत अभियंता म्हणून मोलाचे कार्य व योगदान. पद्मश्री विजय भटकर यांच्या सारख्या शास्रज्ञांच्या सोबत परम महासंगणक निर्मिती कार्यात मोलाचे योगदान.

▪️ *आपल्या मातीवर प्रेम करणारा समाजाभिमुख ज्ञानसेवक:*
▫️देशा-परदेशात उच्चपदावर जाण्याची संधी असतानाही, केवळ आपली माती व आपल्या माणसाच्या प्रेमापोटी, जिव्हाळ्यापोटी आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्यासाठी करण्याच्या उद्दात्त भावनेतून, आपल्याच मातीतल्या विद्यार्थ्यांसाठी सनबीम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानसेवा सुरू केली. 

▪️ *समाजाभिमुख उद्योजक*
▫️सन १९९८ पासुन : *संस्थापक अध्यक्ष व कार्यकारी संचालक*, सनबीम शिक्षण समूह. 
▫️कराड व पुणे येथील सनबीम शिक्षण संस्थेमार्फत आजवर २५ हजारांपेक्षा अधिक पदवीधर सी-डॅकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रशिक्षित करून देशा-परदेशातील विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळवून देण्याचं काम.
▫️पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर विभागातील ५०० हुन अधिक माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रांचे समन्वयन करीत आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे काम.

▪️ *शैक्षणिक पार्श्वभूमी आहे तरी काय..?*
▫️एस.एस.सी.: सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल, पुणे-१९८७ (८५.३३%)
▫️राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती (N.T.S.) विजेता १९८७ .
▫️एच.एस.सी: सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल, पुणे-१९८९ (९०.३३%)
▫️बी.ई. (मेकॅनिकल): एम.आय.टी., पुणे- १९९३ (First Class)
▫️एम.बी.ए. (फायनान्स): सिम्बॉयोसिस, पुणे १९९६ (Distinction)

▪️ *बहुगुणवंत विद्यार्थी : पुरस्कार व पारितोषिके*
▫️उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल, पुणे १९८९.
▫️उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार एम. आय. टी. महाविद्यालय, पुणे १९९३.

▪️ *राष्ट्रीय क्रीडापटू:*
▫️ज्युनिअर राष्ट्रीय मैदानी स्पर्धा १९९१ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व व पदके प्राप्त.

I बहुगुणवंत विद्यार्थी I विद्यार्थी प्रिय ख्यातनाम तज्ञ प्रशिक्षक I राष्ट्रीय क्रीडापटू I कार्यकुशल संघटक I अभ्यासू कार्यकर्ता I समाजाभिमुख उद्योजक I अनुभवसंपन्न तंत्रज्ञ I सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित 'युवा आयडॉल' I

जनसेवेचा आणि शाश्वत विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी... *सदैव कटिबद्ध !*

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे ही जरुर भेट द्या:* 
https://www.facebook.com/sarang.patil

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त