*कराड कॉटेज हॉस्पिटल च्या कॅथलॅब स्थलांतर निर्णय स्थगित करावा
*कराड कॉटेज हॉस्पिटल च्या कॅथलॅब स्थलांतर निर्णय स्थगित करावा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी *कराड :* कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय मागील काही महिन्यापूर्वी शासनाने घेतला होता. पण दोन दिवसापूर्वी शासन आदेश काढून कॅथलॅब सातारा जिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा याबाबत पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना दिले आहे. या पत्रात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी व सूचना केली आहे कि, कराड येथे उपजिल्हा रुग्णालय असून शासनाच्या कॅथलॅब स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे कऱ्हाडसह, सातारा, खटाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, पाटण या सात तालुक्यांतील रुग्ण उपचाराला मुकणार आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांसह वृद्धापकाळाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत या रुग्णांसाठी कॅथलॅब ची गरज लक्षात घेता, कराड उपजिल्हा रुग्णालयातील मंजूर कॅथलॅब स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने मागे...