आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी पोतले ग्रामपंचायतचे सरपंच संदीप पाटील न्युज सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
सर्व हितचिंतक, मित्रमंडळी, ग्रामस्थ बंधू-भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे की,
*सरपंच परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य* व *पंचायत समिती,कराड*
......यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला
*"स्व.यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच पुरस्कार-2023"*
*मा.श्रीमती क्रांती बोराटे मॅडम*
(उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणीपुरवठा जि.प.सातारा),
*मा.श्रीमती मीनाताई साळुंखे मॅडम*
(गटविकास अधिकारी वर्ग-१ तथा प्रशासक पं. स.कराड),
*मा.श्री.जितेंद्र भोसले साहेब*
(अध्यक्ष-सरपंच परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य)
*मा.श्री.शंकराव खापे(बापू)*
*(मार्गदर्शक-सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य.)
*मा.श्री.सतिशराव इंगवले(पैलवान)*
*(प.म.उपाध्यक्ष-सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य.)
*मा.श्री.विजय जाधव(साहेब)*
*(प्राचार्य-पंचायतराज प्र केंद्र वर्ये सातारा.)
....यांच्या शुभहस्ते मला देण्यात आला.
*धन्यवाद... बापू व आपली सर्व निवड समिती.*
........मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पुरस्कार प्राप्त झाला आहे. मी ज्यांना माझे आदर्श मानतो, ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री *स्व.यशवंतरावजी चव्हाण(साहेब)*
......यांच्या नावाचा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार मला जाहीर झाला व तो पुरस्कार *स्व.वेणूताई चव्हाण* सभागृहामध्ये दिला जाणार आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
आज हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा सन्मान नसून या पुरस्काराचे खरे मानकरी मी एकटा नसून माझ्यासोबत काम करणारे उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ-महिला तरुण युवक मित्र आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षात खंबीरपणाने साथ देणाऱ्या मित्रांचा आणि कुटुंबीयांचा सन्मान आहे. या सन्मानामुळे मला अजून जोमाने काम करायची ऊर्जा मिळाली आहे.
येणाऱ्या काळात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, ग्रंथालय, सोलर पॉवर प्रोजेक्ट, वृक्षारोपण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, घंटागाडी, शालेय शिक्षण आणि आरोग्य संबंधित उपक्रम अशी बरीच कामे आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करणार आहोत. मी आणि आमचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य पारदर्शक कारभारासाठी बांधील आहोत. तसेच आपल्या गावाला पुरस्कार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी येणाऱ्या काळात लोकसहभाग वाढवून सर्वांच्या प्रयत्नातून गावातील सर्व स्तरावर अनेक विकासकामे करायची आहेत त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
सर्व आयोजक, सरपंच परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य आणि पंचायत समिती कराड तसेच पुरस्कार निवड समिती यांनी माझी *"स्व.यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच पुरस्कार 2023"* साठी निवड करून पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मी आभारी आहे....!!!
माझ्यावर आपले प्रेम आणि शुभाशीर्वाद असेच राहू द्या.
धन्यवाद.....!!!
-----------------------------------------------
आपलाच :-
*श्री.संदीप पाटील पोतलेकर.*
*(मा.सरपंच-ग्रामपंचायत पोतले.)*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment