आबालवृध्द हास्यमित्र रमले बालपणीच्या जुन्या खेळातपारंपारिक पोशाखात भरली नव्वदीतील हास्य खेळाडूंची शाळाजागतिक हास्यदिनानिमित्त आनोखा उपक्रमकराड ःयेथील प्रितीसंगम हास्य परिवाराने जागतिक हास्यदिनानिमित्त आनोखा उपक्रम राबवला. पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. खो-खो, कब्बडी, आट्यापाट्या, भवरा, गोट्या, आबा डबा अशा विविध खेळांसह झूकझूक अगिनगाडी व फुगड्या आशा जुन्या खेळात आबालवृध्द खेळाडू रमले होते. या उपक्रमाद्वारे अनेकवर्षापूर्वी अनुभवलेल्या शाळेतील दिवसांना पुन्हा उजाळा देण्यात आला. आजच्या धावपळीच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हसणे दुर्मिळ होत चालले आहे. असे असले तरी कृत्रिम हास्यातून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शहराशहरात हास्यक्लबची स्थापना झाली आहे. खळखळून हसण्याचे रूपांतर आत्ता कृत्रिम हास्ययोगात होताना दिसत आहे. वैद्यकिय पातळीवर हास्याच्या अनेक तपासण्या होऊन नैसर्गिक किंवा कृत्रिम असो, हास्य हे मानवी शरीरातील अनेक रोगावर प्रभावी औषध असल्याचे सिध्द झाले आहे. या सत्यतेमुळे शहरा-शहरामध्ये हास्य क्लबचे लोन पोहचले आहे. म्हणूनच हास्ययोगाला सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली असल्याचे शास्त्रीय दृष्ट्या मान्य झाले आहे. जगामध्ये योग म्हंटले की, पहिले नाव घेतले जाते ' ध्यानयोग' , तसेच 'ज्ञानयोग' , 'राजयोग' हे पण आठवतात. पण कोणालाही हास्ययोग आठवत नाही. योग याचा अर्थच असा आहे की, नियमितपणे सराव करत राहणे. त्या मानाने ध्यानयोग, ज्ञानयोग या क्रिया खूप अवघड आहेत. ध्यानयोग आणि ज्ञानयोग हा प्रयत्नाने प्राप्त होत असतो. पण सगळ्यात महत्वाचे आजकालच्या गतिमान युगात हे प्राप्त करण्यासाठी एवढा वेळ कोणापाशी आहे का ? म्हणूनच सगळ्यात सोपा असा ' हास्ययोग' आहे. आजकाल आपण हसतो पण क्वचितच ! खळखळून हसणं हा प्रकार तर अलीकडे दुर्मिळ आहे. हसणं हे मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या देणगीचा विसर पडला आहे. म्हणूनच हास्ययोगाची आवश्यकता आहे. हास्ययोग म्हणजे नुसते हासणे नव्हें. हास्याला योगाशी जोडल्याने त्याला हास्ययोग म्हटले आहे. हास्यामुळे आपणा सर्वांना निरागस आनंदी व आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा एक सहज सोपा पण अत्यंत प्रभावी असा मार्ग उपलब्ध झाला आहे. ७ मे हा जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधत कराड येथील प्रितीसंगम हास्यपरिवाराने एक आनोखा उपक्रम राबवला. पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती. खो-खो, कब्बडी, आट्यापाट्या, भवरा, गोट्या, आबा डबा, भिंगरी, काचकवडी अशा विविध खेळांसह झूकझूक अगिनगाडी व झिम्मा-फुगड्या आशा जुन्या खेळात आबालवृध्द खेळाडू रमले होते. या उपक्रमाद्वारे अनेकवर्षापूर्वी अनुभवलेल्या शाळेतील दिवसांना पुन्हा उजाळा देण्यात आला. चौकटचटणी भाकरीसह खरडा लोणचे डब्यांची पंगतखाकी हाफपँन्टव पाढरा शर्ट डोक्यावर गांधी टोपी परिधान केलेली मुले. तर फ्रॉकसह सलवार कुडता घातलेल्या मुली अशा पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती. शाळेत येताना प्रत्येकाने जेवनाचा डबा आनला होता. डब्यात चटणी भाकरीसह खरडा लोणचे, दही तर त्याच्या जोडीला कैरी, कांदा व गुळ शेंगा एकत्र करून पंगत पडली होती.
आबालवृध्द हास्यमित्र रमले बालपणीच्या जुन्या खेळात
पारंपारिक पोशाखात भरली नव्वदीतील हास्य खेळाडूंची शाळा
जागतिक हास्यदिनानिमित्त आनोखा उपक्रम
येथील प्रितीसंगम हास्य परिवाराने जागतिक हास्यदिनानिमित्त आनोखा उपक्रम राबवला. पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. खो-खो, कब्बडी, आट्यापाट्या, भवरा, गोट्या, आबा डबा अशा विविध खेळांसह झूकझूक अगिनगाडी व फुगड्या आशा जुन्या खेळात आबालवृध्द खेळाडू रमले होते. या उपक्रमाद्वारे अनेकवर्षापूर्वी अनुभवलेल्या शाळेतील दिवसांना पुन्हा उजाळा देण्यात आला.
आजच्या धावपळीच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हसणे दुर्मिळ होत चालले आहे. असे असले तरी कृत्रिम हास्यातून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शहराशहरात हास्यक्लबची स्थापना झाली आहे. खळखळून हसण्याचे रूपांतर आत्ता कृत्रिम हास्ययोगात होताना दिसत आहे. वैद्यकिय पातळीवर हास्याच्या अनेक तपासण्या होऊन नैसर्गिक किंवा कृत्रिम असो, हास्य हे मानवी शरीरातील अनेक रोगावर प्रभावी औषध असल्याचे सिध्द झाले आहे. या सत्यतेमुळे शहरा-शहरामध्ये हास्य क्लबचे लोन पोहचले आहे. म्हणूनच हास्ययोगाला सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली असल्याचे शास्त्रीय दृष्ट्या मान्य झाले आहे. जगामध्ये योग म्हंटले की, पहिले नाव घेतले जाते ' ध्यानयोग' , तसेच 'ज्ञानयोग' , 'राजयोग' हे पण आठवतात. पण कोणालाही हास्ययोग आठवत नाही. योग याचा अर्थच असा आहे की, नियमितपणे सराव करत राहणे. त्या मानाने ध्यानयोग, ज्ञानयोग या क्रिया खूप अवघड आहेत. ध्यानयोग आणि ज्ञानयोग हा प्रयत्नाने प्राप्त होत असतो. पण सगळ्यात महत्वाचे आजकालच्या गतिमान युगात हे प्राप्त करण्यासाठी एवढा वेळ कोणापाशी आहे का ? म्हणूनच सगळ्यात सोपा असा ' हास्ययोग' आहे. आजकाल आपण हसतो पण क्वचितच ! खळखळून हसणं हा प्रकार तर अलीकडे दुर्मिळ आहे. हसणं हे मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या देणगीचा विसर पडला आहे. म्हणूनच हास्ययोगाची आवश्यकता आहे. हास्ययोग म्हणजे नुसते हासणे नव्हें. हास्याला योगाशी जोडल्याने त्याला हास्ययोग म्हटले आहे. हास्यामुळे आपणा सर्वांना निरागस आनंदी व आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा एक सहज सोपा पण अत्यंत प्रभावी असा मार्ग उपलब्ध झाला आहे. ७ मे हा जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधत कराड येथील प्रितीसंगम हास्यपरिवाराने एक आनोखा उपक्रम राबवला. पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती. खो-खो, कब्बडी, आट्यापाट्या, भवरा, गोट्या, आबा डबा, भिंगरी, काचकवडी अशा विविध खेळांसह झूकझूक अगिनगाडी व झिम्मा-फुगड्या आशा जुन्या खेळात आबालवृध्द खेळाडू रमले होते. या उपक्रमाद्वारे अनेकवर्षापूर्वी अनुभवलेल्या शाळेतील दिवसांना पुन्हा उजाळा देण्यात आला.
चटणी भाकरीसह खरडा लोणचे डब्यांची पंगत
खाकी हाफपँन्टव पाढरा शर्ट डोक्यावर गांधी टोपी परिधान केलेली मुले. तर फ्रॉकसह सलवार कुडता घातलेल्या मुली अशा पारंपारिक पोशाखात पाच वर्ष ते नव्वदीतील हास्य विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती. शाळेत येताना प्रत्येकाने जेवनाचा डबा आनला होता. डब्यात चटणी भाकरीसह खरडा लोणचे, दही तर त्याच्या जोडीला कैरी, कांदा व गुळ शेंगा एकत्र करून पंगत पडली होती.
Comments
Post a Comment