मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते शासन आपल्या दारी योजनेचा दौलतनगर येथे 13 मे रोजी शुभारंभ शनिवारी शुभारंभ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते शासन आपल्या दारी योजनेचा दौलतनगर येथे शनिवारी शुभारंभ...

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत 25000 पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणार लाभ....

दौलतनगर  :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकल्पनेतून राज्य शासनाचेवतीने सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे. सातारा जिल्हयात शासन आपल्या दारी या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. श्रीकांत शिंदे यांचे शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवार 13 मे रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर ता. पाटण येथे होणार आहे. याप्रसंगी शासन आपल्या दारी योजने अंतर्गत पाटण तालुक्यातील 25000 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा मेळावा व जाहिर सभाही होणार असल्याची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक