कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर
कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनकडून घोषणा; लवकरच होणार वितरण कराड, ता. २३ : राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने, दरवर्षी राज्यातील विविध सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत खास पुरस्कार दिले जातात. सन २०२३-२४ सालचा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. असोसिएशनने नुकत्याच घेतलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत, पुणे विभागातून रु. ५०० कोटी ते रु. १००० कोटीपर्यंच्या ठेवी असलेल्या बँकांमधून, सन २०२३-२४ सालच्या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड केली आहे. कृष्णा बँकेल...